Home Breaking News *मराठा समाज्याच्या वतीने* *समाजजागृती मोहीम ,* *एकच ध्येय मराठा आरक्षण.*

*मराठा समाज्याच्या वतीने* *समाजजागृती मोहीम ,* *एकच ध्येय मराठा आरक्षण.*

107
0

*मराठा समाज्याच्या वतीने* *समाजजागृती मोहीम ,*
*एकच ध्येय मराठा आरक्षण.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यात मराठा समाज्याच्या वतीने पेठ वडगांव परिसरातील जवळपास ३१ गावामध्ये मराठा समाजाचे आभ्यासक सोबत घेऊन मराठा बांधवाना संपर्क साधुन जनजागृती करण्यात येणार आहे.
मराठा समाजएकत्रीत येऊन पुढील दिशा ठरवून कशा पद्धतीने मराठा आरक्षण मिळविण्यासाठी तीव्र लढा द्यायला पाहीजे यासाठी समाज जागृती करण्याविषयी चर्चा करण्यात
आली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा समाजाने आरक्षणासाठी यापूर्वी अनेक मूक मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा अशी आंदोलन केली आहेत.
जर सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसेल तर मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आता आम्हाला लढाई सुरू करावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची अत्यंत गरजेचे आहे.
या करीता मराठा समाज्याच्या वतीने जिल्ह्यात , तालुक्यात, गावागावातुन मराठा समाज जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी मराठा समाजाचे विजयसिंह शिंदे वडगांव , प्रल्हाद पाटील घुणकी , प्रविन खोपकर किणी , पुंडलिक बिंरजे आळते , अभयसिंह यादव वडगांव , गोरख शिंदे वाठार , मच्छिंद्र पाटील पारगांव , हनमंत पाटील सावर्डे , संतोष माने किणी, सयाजी पाटील चावरे ,आसमान मोहीते घुणकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“एक मराठा लाख मराठा”

Previous article🛑 मराठा समाजाला ठाकरे सरकारचा मोठा दिलासा…..! मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय 🛑
Next article*रुग्णवाहिकेसाठी 15 लाखांचा निधी मंजूर माजी.मुख्यमंत्री.पृथ्वीराज चव्हाण*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here