Home गडचिरोली गडचिरोली डिजिटल प्रेस’ ची कार्यकारिणी गठीत – अध्यक्षपदी विनोद कोडापे तर सचिव...

गडचिरोली डिजिटल प्रेस’ ची कार्यकारिणी गठीत – अध्यक्षपदी विनोद कोडापे तर सचिव पदी सचिन जिवतोडे यांची निवड ;कार्यकारिणीत “युवा मराठा न्युज”चे सुरज गुंडमवार

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0039.jpg

‘गडचिरोली डिजिटल प्रेस’ ची कार्यकारिणी गठीत
– अध्यक्षपदी विनोद कोडापे तर सचिव पदी सचिन जिवतोडे यांची निवड ;कार्यकारिणीत “युवा मराठा न्युज”चे सुरज गुंडमवार

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) बदलत्या काळानुसार देशभरात “डिजिटल इंडिया” या संकल्पनेनुसार अनेक कामे डिजिटल झाली आहेत. त्याच बरोबर दैनंदिन घडामोडी, बातम्या याबाबत डिजिटल मीडियाचा व्यापही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात असून डिजिटल मीडिया विषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे नव्याने ‘गडचिरोली डिजिटल प्रेस’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
२१ ऑगस्ट रोजी स्थानिक गडचिरोली येथे डिजिटल मीडियाशी निगडित न्यूज पोर्टल व युट्युब न्यूज चॅनलच्या संपादक व प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष पदी ‘महाराष्ट्र वार्ता न्युज २४’ चे विनोद कोडापे,

सचिव पदी ‘The गडविश्व’ न्यूज चे सचिन जिवतोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर या संघटनेत ‘लोकशाही न्यूज’ पोर्टल चे संदीप कांबळे, ‘सत्यशोधक न्युज’ पोर्टल व युट्युब चॅनलचे दिपक बोलीवार, ‘विदर्भ ब्रेकिंग न्युज’ चे जीवन चुधरी, ‘युवा मराठा न्यूज’ चे सुरज गुंडमवार, ‘विचार क्रांती न्यूज’ चे अनुप मेश्राम,निलेश सातपुते लोकवृत यांचाही समावेश आहे.
आताच्या घडीला झटपट बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. कोणतीही घटना अथवा बातमी, घडामोडी झटपट ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत असून वाचकांचा कलही वाढतांना दिसत आहे.

यापुढेही डिजिटल मीडिया शी निगडित न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधींना संघटनेत सामावून घेतल्या जाणार आहे तरी गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संबंधित ज्या संपादक व प्रतिनिधींना संघटनेशी जुळून काम करायचे अश्या संपादक व प्रतिनिधींनी संपर्क करण्याचे आवाहन ‘गडचिरोली डिजिटल प्रेस’ च्या वतीने अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून हि संघटना जिल्ह्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना न्याय, हक्क मिळवून देण्यास सर्वोतपरी प्रयत्नशील राहणार आहे.

संघटनेत आपला सहभाग नोंदविण्याकरिता विनोद कोडापे 83808 02959, सचिन जिवतोडे 97676 42426 या क्रमांकावर संपर्क करावे.
संघटनेच्या माध्यमातून पत्रकार पत्रकार परिषदा घेण्यात येतील. संपर्क – 83808 02959, 97676 42426

– ऑनलाईन न्यूज चा प्रतिसाद बघता विविध न्यूज पोर्टल धारक ऑनलाईन बातम्या प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोचवित आहेत. मात्र जिल्ह्यात डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल पत्रकार संघटित होऊन विविध समस्या मार्गी लागाव्यात याकरिता डिजिटल मीडिया संघटना असणे आवश्यक होते. याचाच विचार करता ‘गडचिरोली डिजिटल प्रेस’ या नावाने संघटना तयार करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांना संघटित करून डिजिटल मीडियाविषयी योग्य मार्गदर्शन करून विविध समस्या सोडवल्या जातील तसेच पत्रकार परिषदेमधून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केल्या जाईल.
👆👆
सचिन जिवतोडे
सचिव ‘गडचिरोली डिजिटल प्रेस’
संपादक ‘The गडविश्व’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here