Home गडचिरोली रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध : स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार...

रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध : स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0040.jpg

रेती घाटाच्या लिलावाला ग्रामसभेचा विरोध : स्वतः वापर व विक्रीसाठी नियोजन करणार

पुलखल ग्रामसभेने एकमताने ठराव केला पारित

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : शासनाच्या खनिकर्म विभागाच्या मार्फत सन २०२२ – २३ व पुढिल तीन वर्षांसाठी रेतीघाट लिलाव करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव पुलखल ग्रामसभेने आजच्या ग्रामसभेत एकमताने नाकारला आणि निस्तार हक्कानुसार गावातील नागरिकांना आवश्यक कामासाठी वापर तसेच गावातील बेरोजगारी दूर करण्यासाठी व स्वतः रेती विक्री करण्यासाठी संघर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पारित केला.

आज झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जयश्रीताई वेळदा तर सरपंच सावित्री गेडाम, उपसरपंच रुमनबाई ठाकरे, ग्रा.पं. सदस्य तुकाराम गेडाम, कविता ठाकरे, खुशाब ठाकरे, जिजाबाई आलाम, सचिव एन.डी. मोटघरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गिरिधर ठाकरे, माजी सरपंच रेखाताई सेडमाके, जेष्ठ नागरिक सितकुराजी जराते, आनंदराव ठाकरे, शामराव ठाकरे, कवळू रोहणकर, मायाबाई ठाकरे, शामलाबाई पालकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सन २०२२-२३ आणि २०२३-२४ चा नियोजन आराखडा तयार करणे, विधवा प्रथा बंद करणे, गावातील ढिवर समाजाला तलावांमध्ये मच्छीपालनाचे अधिकार देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वाढीव पाणी पुरवठा आणि जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, रस्ते मजबूतीकरण, पथदिव्यांची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगण विकासाचे नियोजन करणे यासारखे ठरावही एकमताने पारित करण्यात आले. आजच्या ग्रामसभेला दिडशेहून अधिक महिला, पुरुष उपस्थित होते.

Previous articleगडचिरोली डिजिटल प्रेस’ ची कार्यकारिणी गठीत – अध्यक्षपदी विनोद कोडापे तर सचिव पदी सचिन जिवतोडे यांची निवड ;कार्यकारिणीत “युवा मराठा न्युज”चे सुरज गुंडमवार
Next articleमहाराष्ट्रात लव जिहाद चे रेड कार्ड?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here