राजेंद्र पाटील राऊत
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा:- मेशी आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या वतीने यावर्षी आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला .छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी जसे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र करत स्वराज्य स्थापन केले त्याच पद्धतीने अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांच्यातील सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.९६ वर्ष वयाच्या नागरिकांचा सत्कार यावेळी केला .सुरुवातीला जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून सवाद्य प्रभात फेरी काढण्यात येऊन नंतर जगदंबा चौकात प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिका बोरसे यांनी महाराजांच्या जीवनकार्याला उजाळा दिला.
फोटो:- शिवजयंतीचे औचित्य साधत मेशी येथील सगळ्यात ज्येष्ठ आजीबाई शांताबाई काशिनाथ भारती वय वर्षे १०९ यांचा सत्कार करताना शिवप्रेमी व ग्रामस्थ