Home मुंबई भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त...

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त : राज्य सरकारने उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली..!

127
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त : राज्य सरकारने उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली..!

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
“..तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज (रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”
तर, “लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आज सकाळी ८.१२ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.

Previous articleगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास.
Next articleश्रीक्षेत्र मंगरूळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here