Home विदर्भ श्रीक्षेत्र मंगरूळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द

श्रीक्षेत्र मंगरूळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द

191
0

राजेंद्र पाटील राऊत

श्रीक्षेत्र मंगरूळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द

वाशिम- ( रितेश गाडेकर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) येथील श्री संत बिरबलनाथ महाराज यांच्या ९३ वा यात्रा महोत्सव कोरोना विषाणू संसर्गाच्या नियमावलीनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय संस्थान व्यवस्थापनाकडून घेण्यात आला असून हा धार्मिक सोहळा कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या अटी,शर्ती व नियमाचे पालन करून दि.१९/०२/२०२२ शनिवार रोजी स.१० वाजता श्री ची महापूजा तर दि .२१/०२/२०२२ सोमवार रोजी दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना सोशल डिस्टन्स चा वापर करून दर्शन रांगेतच प्रसाद देण्यात येणार आहे.दि.२२/०२/२०२२ मंगळवार स.१० वा श्री च्या पालखीची मिरवणूक मंदिराच्या आत मधेच प्रदिक्षणा पूर्ण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. महाप्रसाद व गावामधील श्री च्या पालखी ची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांकरिता संस्थांकडून सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली आहे. तर भाविकांनी तोंडाला मास्क व गर्दी न करता सोशल डिस्टन्स चा वापर करण्याबाबत विनंतीग ह क क प करण्यात आली आहे. मंदिरात होणारी गर्दी टाळण्याकरिता भाविकांनी दर्शन झाल्यावर लगेच मंदिराबाहेर निघून जावे अशी विनंती सुद्धा संस्थांन कडून करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा यात्रा उत्सव अगदी साध्या पद्धतीने व शासनाने घालून दिलेल्या कोरोना विषयक नियम, अटी व शर्ती चे काटेकोर पालन करून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापकांनी कळविले आहे. पटांगणावरील व्यापारी झुले,दुकाने खाद्य पेयांचे व मनोरंजनाचे स्टॉलची असणारी यात्रा संस्थान व्यवस्थापनाकडून शासनाच्या नियमावलीनुसार रद्द करण्यात आली असून भाविकांनी महाप्रसाद व यात्रेकरिता आपली स्वेच्छा देणगी मंदिरात आणून द्यावी अशी विनंती सुद्धा संस्थान व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.दि.१६/०२/२०२२ बुधवारला श्री बिरबलनाथ महाराज यांचे संजीवन जिवंत समाधी दिनानिमित्त दु.०४-०० ते ०८-०० अभिषेक पूजा व होम चा कार्यक्रम कोरोना विषयक नियमावलीचे पालन करून होणार आहे. तरी कोरोना विषयक शासनाने घालून दिलेल्या नियम,अटी व शर्तीचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याकरिता भाविकांनी सहकार्य करावे अशी सुद्धा विनंती संस्थान व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here