Home बीड ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लॉजमध्ये नेऊन बलात्कार!

ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लॉजमध्ये नेऊन बलात्कार!

57
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_055219.jpg

ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लॉजमध्ये नेऊन बलात्कार!

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/वडवणी दि:०४ दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉज मध्ये नेऊन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वडवणी येथे उघडकीस आली आहे. बीड परळी रोडवरील सदिच्छा हॉटेलमधील लॉजवर नेऊन नराधमाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सदरील नराधम हा अल्पवयीन असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. वडवणी येथे पीडित अल्पवयीन मुलगी दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणी सोबत शाळेत जात असताना त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये आलेल्या आरोपीने पीडितेला तुझ्या मैत्रिणींना मारहाण होत असून तुला तिने बोलवले आहे, असे सांगितले. त्यानंतर पिढीतील आकार मध्ये बसून बीड रोडवर असलेले सदिच्छा हॉटेलमधील लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिला जीवनाची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी आरोपीने पिढीतील मारहाण देखील केली. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नराधमाच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात कलम ३७६,३७६ (आय)(आय) ३२३,५०६ भांदविसह कलम ४,८,१२ पोस्को प्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी मुलाविरुद्ध आणखी एका मुलीने तक्रार दिल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची चर्चा आहे. पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी दहा वाजता वडवणी पोलीस ठाण्यात गेली होती मात्र गुन्हा दाखल केला जात नव्हता. दोन्ही बाजूचे लोक आणि राजकीय नेते ठाण्यामध्ये आलेले होते. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नायगाव तालुका उपध्यक्षपदी सुरेश पाटील भेलोंडे यांची निवड.
Next articleकुणबी मराठा महासंघ लोहा तालुकाध्यक्ष पदी अंबादास पाटील पवार यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here