Home नांदेड जांब,बाऱ्हाळीसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा -काँग्रेसची मागणी

जांब,बाऱ्हाळीसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा -काँग्रेसची मागणी

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0026.jpg

जांब,बाऱ्हाळीसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा
-काँग्रेसची मागणी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड
मुखेड शहरालगत अवैध क्लबसह जांब येथील दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर जांब, बाऱ्हाळी आदि व्यापारपेठांसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी आज काँग्रेसने केली.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुखेडच्या प्रशासक सौम्या शर्मा यांना काँग्रेस पक्षाकडून प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, तालुका उपाध्यक्ष उत्तमाण्णा चौधरी व माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार काशिनाथ पाटील, मुख्याधिकारी थोरात उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मुखेड शहरालगत नुकतेच एका अवैध क्लबवर धाडसी सशस्त्र दरोडा पडल्याची बातमी प्रमुख वृत्त पत्रातून प्रकाशीत झाली . त्यात १५ लाख रोकड व १ ९ तोळे सोने लुटल्याची चर्चा आहे . त्यानंतर लगेचच दोन तिन दिवसाच्या अंतराने तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या जांब येथे लगातार दोन दिवस दरोडा व चोरीचे प्रकार घडले आहेत . यामुळे कुख्यात संघटीत दरोडे खोरांचे लक्ष मुखेड़ शहर व परिसरावर आहे हे लक्षात येते .यामुळे शहर व परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यामुळे मुखेडमध्येही एखादा संजय बियाणी होऊ नये म्हणून मुखेडच्या व्यापारी , नागरीक यांच्या सुरक्षेसाठी त्वरीत मुखेड शहरात विविध चौकांत व बान्हाळी , जांब , मुक्रमाबाद , बेटमोगरा आदी तालुक्यातील व्यापारपेठांच्या गावात सि.सि. टीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी .अन्यथा मुखेडच्या सुरक्षेसाठी कॉंग्रेसकडून या मागणीस्तव तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सौम्या शर्मा यांनी सकारात्मक उत्तर देऊन लवकरच सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील असे सांगितले.याप्रसंगी प्र.सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, तालुका उपाध्यक्ष उत्तमाण्णा चौधरी,माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड,माजी नगरसेवक हणमंत नारनाळीकर, चेअरमन हेमंतकुमार घाटे,शहर सरचिटणीस रामेश्वर पाटील इंगोले, युवक काँग्रेस सरचिटणीस जयप्रकाश कानगुले,माजी उपनगराध्यक्ष रामदास पाटील, शिवकांत मठपती,शिवा गायकवाड,बालाजी साबणे, पृथ्वीराज चौव्हाण, बालाजी वाडेकर, अण्णासाहेब जाहीरे, मारोती घाटे आदींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here