Home गडचिरोली मी इतक्यात आपल्या पर्यंत काही कारणास्तव पोहचू शकलो नाही परंतु गैरसमज करू...

मी इतक्यात आपल्या पर्यंत काही कारणास्तव पोहचू शकलो नाही परंतु गैरसमज करू नये ही नम्र विनंती… मी सदैव आपल्या साठी झटत होतो आहे आणि सदैव झटतच राहणार.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0023.jpg

मी इतक्यात आपल्या पर्यंत काही कारणास्तव पोहचू शकलो नाही परंतु गैरसमज करू नये ही नम्र विनंती…

मी सदैव आपल्या साठी झटत होतो आहे आणि सदैव झटतच राहणार.                                                 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मागील काही दिवसांपासून
लोकसभा अधिवेशन सुरू आहे. रोज विविध विषयांवर चर्चा होत असतात तसेच संसदीय कार्यक्रम,आढावा,या कारणास्तव मी आपल्या भेटी साठी येण्यासाठी असक्षम होतो.लोकसभा संसदीय कार्य हे प्रत्येक शनिवारी,रविवारी बंद असतो मी आपल्या भेटी करिता माझी तडमड सुरू होती पण राष्ट्रपती,उपराष्ट्रपती निवडणूका आल्या आणि माझे आपल्या कडे येणे पुढे ढकल्या जात होते.पण
मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील पूर ग्रस्त भागातील माझ्या जीवभावांची आपुलकीची सदैव माझ्या साठी अत्यन्त महत्वपूर्ण ज्यांच्या माध्यमातून मी आज आपला आवाज संसदेत बुलंद करत आहे असा माझा परिवार म्हणजे माझी जनता माझे माय बाप मी आपल्या बद्दल रोज आढावा घेत होतो.आता सुध्दा अधिवेशनात असल्याने माझे शक्य होत नाही आहे.आपल्यावर जे संकट उदभवले आहे त्या बद्दल मला जाण होती आहे.जो नैसर्गिक संकट उदभवले आहे त्या संकटाला सामोरे आपण सगळेच मिळुन जातच आहोत. माझी जनता अडचणी मध्ये असताना माझे पण मन लागत नव्हते मी आपल्या सोबत व्यक्तिशः काही कारणास्तव येऊ शकत नव्हतो तरी मी आपली आवाज,आपले दुःख अडचणी,पूर परिस्थिती बद्दल सभागृहाच्या माध्यमातून माझ्या लोकसभा क्षेत्रातील प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी इथे लढतच आहे
मी माझ्या लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पूर ग्रस्त क्षेत्रातील जनतेच्या मदती करता दिल्लीला लोकसभा मध्ये झटत आहो आणि सदैव झटतच राहणार मी अतिवृष्टी झालेल्या भागा मध्ये लक्ष ठेवून होतोच याबद्दल गडचिरोली जिल्हाधिकारी त्या क्षेत्रातील तहसीलदार,पटवारी,आरोग्य अधिकारी व तसेच संबधित सर्व अधिकाऱ्यांन सोबत संपर्क करून नुकसानग्रस्त झालेल्या भागाची माहिती घेत होतो.व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू,आरोग्य सुविधांची कमी नाही पडली पाहिजेत अशी सूचना अधिकाऱ्यांना सक्त ताकीदी सह सक्त निर्देश मी दिलेले होते.पूर प्रस्तिथीच्या सुरवातीलाच माननीय मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला असताना पूर ग्रस्त आढावा बैठक मध्ये मी अनेक अडचणी, रस्ते,आरोग्य,वाघाचे होणारे हल्ले, शेतकऱ्याचे हॊणारे नुकसान त्वरित सर्वे करावे तसेच मी काही दिवसा पूर्वी संसद भावना मध्ये
अधिनियम ३७७ अनुसार गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना,शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई करून द्यावा म्हणून लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले
प्रश्न लावून मी थांबलो नाही त्यासम्बधित लागणारी माहितीचा पाठपुरावा सुध्दा करीत आहे.या सम्बधित मंत्री मोहदया सोबत माझ्या भेटी सुरू आहे.मी उपस्थित केलेल्या प्रश्नावर
आणि नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देऊ असे आश्वासन सुद्धा केंद्र सरकारने मला दिले आहे.
केंद्र सरकारने काही उशीर न करता त्वरित केंद्रीय पथक पाठवून पंचनामे करण्याचे सूचना देण्यात आले.आणि सम्बधित केंद्रीय,राज्यसरकार टीम सुध्दा कदाचित दाखिल झालेली असावी.तत्पूर्वी मी काही महिन्यांपूर्वी अहेरी विधानसभा क्षेत्राता मध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाचा आढावा सुद्धा घेतलेला होता.पावसाळा चालू होण्यापूर्वी मी स्वतः सिरोंचा दौरा सुध्दा करून नेहमी अतिवृष्टी मुळे माहापूर परिस्थिती निर्मित होणाऱ्या भागाची पाहाणी सुद्धा केलेली होती.व या भागाकडे लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या होत्या.
तसेच माननीय जिल्हाधिकारीजी,तहसीलदारजी यांच्या सोबत माझे दररोज विचारपूस चालू होते.माझे देह जरी दिल्ली मध्ये असले तरी माझे मन आणि कर्म माझ्या लोकसभा क्षेत्राच्या जनते सोबतच आहे. मी जरी व्यक्तिशः उपस्थित राहण्या करिता काही कारणास्तव असमर्थ असलो तरी या यासंदर्भात माझ्या भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांन सोबत रोज सम्पर्कात होतो त्यांच्या माध्यमातून सुध्दा माझे मदत कार्य सुरू होते आणि आता पण सुरूच आहे.आणि पूर ओसरले जरी असले तरी सुध्दा आरोग्य सम्बधित समस्या बद्दल माझी आता सुध्दा विचारपूस चालूच आहे .
माझ्या एक बाबा लक्षात आली काही मोजके शुभचितक विरोधकांनी पोस्टरबाजी करून माझ्या बद्दल अपप्रचार आणि माझ्या बद्दल अपमानास्तव सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करीत आहेत… “”माननीय खासदार साहेब हरवले आहेत”” अशी अफवा माझ्या बद्दल पसरवली जात आहे.पण या अफवा बद्दल मी घाबरणार नाहीच कारण आपण एक आहोत माझ्या बद्दल चा होणारा दुःप्रचार,अपमान माझा नसून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील समस्त जनतेचा अपमान आहे.२५ लाख लोकांचं अपमान आहे.मी दिखाव्यात जात नाही मी कर्मा मध्ये विश्वास ठेवतो. माझ्या बद्दल जो जनते मध्ये भ्रम पसरवला जात आहे ते जनता लक्ष ठेऊन आहे.
मी २५ लाख लोकांची,जनतेची माफी मागावी अस काही विरोधक माझ्या बद्दल संभ्रम निर्माण करत आहेत.ते या षड्यंत्र मध्ये कधीही सफल नाही होणार.
मी आजपर्यंत माझ्या क्षेत्रातील सर्व उपस्थित केलेले प्रश्न व माझे केलेले काम न बघता काही उपद्रवी मानसिकतेच्या तसेच काही विरोधकांनी खासदार साहेब हरवलेले आहेत अशी वायरल फोटो करून समस्त जनते मध्ये माझ्याबद्दल भ्रम,द्वेष,अपप्रचार,करून माझ्या बद्दल पोस्ट वायरल करण्यात येत आहे पण ते या माध्यमातून कधीही सफल होणार नाही.त्याच्या मुळे त्यांनी समस्त जनतेची माफी मागावी.आणि जो माझ्या बद्दल अपप्रचार केला आहे तो थांबवावे..!

Previous articleपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना…
Next articleजांब,बाऱ्हाळीसह मुखेड शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा -काँग्रेसची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here