Home पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना…

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना…

157

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0022.jpg

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
घडामोडी, पिं चिं शहर व उपनगर
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना… चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना केली आहे. एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५ अंमलदार यांची नियुक्ती या शाखेसाठी करण्यात आली आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी जिल्हा व पोलीस आयुक्तालाय स्तरावर दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या पथकाची स्थापना केली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक राऊत, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शामवीर गायकवाड, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शिरीष देसाई, पोलीस अंमलदार बसवराज धमगुंडे, पोलीस अंमलदार अरुण कुटे व पोलीस अंमलदार सुयोग लांडे यांचा समावेश आहे.

शहरात कोणत्याही भागात सक्रिय असलेल्या राष्ट्रद्रोही घटनाबद्दल माहिती गोळा करणे. मिळालेल्या माहितीचा सखोल अभ्यास करणे. दहशतवाद प्रतिबंधक उपाय योजना प्रभावीपणे राबवणे. राज्यातील अन्य दहशतवाद विरोधी विभागांशी समन्वय साधून काम करणे असे आहे, अशी माहिती परीमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली.