Home उतर महाराष्ट्र उमराणेत जाणता राजा मित्रमंडळातर्फ वृक्षलागवड संपन्न

उमराणेत जाणता राजा मित्रमंडळातर्फ वृक्षलागवड संपन्न

141
0

राजेंद्र पाटील राऊत

(भिला आहेर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा– हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ जाणता राजा मित्र मंडळा तर्फे “वट वृक्ष लागवड” कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
उमराणे मावळखो-यात जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात.त्यातीलच महराणी सईबाई भोसले वटवृक्ष लागवड उपक्रम २०१८ साला पासून ते २०२५ पर्यंत राबविले येत आहे.हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार किल्लेदार व मावळ्यांनी योगदान दिले आहे.इतिहासाची जेवढी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे मंडळाच्या वतीने शुर  योद्धयांच्या पराक्रमाचे स्मरण व्हावे व तरुणांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ध्यानात घेऊन गेल्या २८ वर्षांपासून उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.यावर्षी शुरवीर योद्धा माणकोजी दहातोंडे यांच्या स्मरणार्थ उमराणे वतनातील परसूलनदीच्या तीरावरील स्व.निवृत्ती काका आठवडे बाजार आवारात वन अधिकारी माणिक साळुखे यांच्या हस्ते वटवृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन कृ,उ.बा.स.सभापती प्रशांत देवरे, मा.सभापती विलास देवरे, प.स.उपसभापती धर्मा देवरे, मुख्याध्यापक श्रीप्रकाश पाटील, वन सेवक रमेश साळुखे, चेरमन संदीप देवरे, भगवान देवरे, सुभाष गायकवाड, अरुण सोनवणे, बाळू देवरे, रवींद्र देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांनी जाणता राजा मंडळाच्या कार्याचा गौरव करीत आजपावेतो राबविलेल्या समाजउपयोगी कार्यामुळे ३५०-४०० वर्षानंतर आजही शिवरायांचे कार्य व त्यांचे सरदार, मावळे यांचा पराक्रमाचा वारसा मंडळाने अखंडपणे सुरु ठेवला आहे.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी सदर उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, प्रवीण देवरे, तात्या देवरे, योगेश देवरे, रामराव देवरे, अनंत देवरे, बाळा पवार, दिनेश देवरे, शांताराम देवरे, अनिल देवरे, भाऊसाहेब पाटील, महेश पवार, गोरख देवरे, तात्या गायकवाड, भारत देवरे, आबा देवरे, डॉ.प्रवीण देवरे, जयेश देवरे आदींसह मंडळाच्या मावळ्यांसह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहे.

Previous articleश्रीक्षेत्र मंगरूळपीर येथील संत बिरबलनाथ महाराज यात्रा रद्द
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here