Home मुंबई गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास.

213
0

राजेंद्र पाटील राऊत

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानाना तृप्त करणारे स्वर आज हरपले.लतादीदींच्या आवाजाच्या परीस स्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंत काळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहील.संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते.

मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती आणि त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. पण शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचे वृत्त आले होते. अखेर उपचारादरम्यान दीदींनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. सम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशात शोककळा पसरली आहे.युवा मराठा न्युज परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली!

Previous articleअमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी निवड
Next articleभारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त : राज्य सरकारने उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here