Home युवा मराठा विशेष गुरचरण जागेवरील अतिक्रमण वाचविण्यासाठी मुख्याधिकारी कार्यालयातुन तहसिलदारांना दोन वेगवेगळी पत्र देऊन दिशाभुल...

गुरचरण जागेवरील अतिक्रमण वाचविण्यासाठी मुख्याधिकारी कार्यालयातुन तहसिलदारांना दोन वेगवेगळी पत्र देऊन दिशाभुल करण्याचा पुन्हा प्रयत्न सुरूच!

223
0

राजेंद्र पाटील राऊत

गुरचरण जागेवरील अतिक्रमण वाचविण्यासाठी मुख्याधिकारी कार्यालयातुन तहसिलदारांना दोन वेगवेगळी पत्र देऊन दिशाभुल करण्याचा पुन्हा प्रयत्न सुरूच!
पालघर(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-  पालघर नवली येथील सर्वे नं-48 या गुरचरण जागेवरील एका कारखानदाराने केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाला वाचविण्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी कार्यालयातुन तहसिलदार पालघर यांना एकाच आशयाची वेगवेगळी व वेगवेगळ्या तारखेची पत्र देऊन कारखानदाराचे अतिक्रमण वाचविण्यासाठीचा बेजबाबदारपणाचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.
पालघरच्या तहसिदारांनी अनधिकृत कारखान्याच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची जबाबदारी पालघर नगरपरिषदेची असल्याचे पत्र दिनांक-06/12/2021 रोजी दिल्या नंतर पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्वाती देशपांडे व सहायक नगररचनाकार रोशनी तामखडे यांनी कारखानदाराला त्यांचे म्हणणे मांडण्याचा मोठा कालावधी देऊन काही महिने वेळकाढू धोरण राबविले होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने या बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई न करणार्‍या तहसिलदार पालघर व मुख्याधिकारी पालघर यांच्या बेजबाबदारपणाचा व निष्क्रियतेचा जाहीर निषेध करण्याकरीता 20 जानेवारी नंतर बेमुदत उपोषण करणार असल्याचे तहसिलदारांना व मुख्याधिकार्‍यांना तसेच संबंधित सर्व विभागांना कळविले होते. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी कारखानदाराच्या म्हणण्याप्रमाणे हे अतिक्रमण पालघर नगरपरिषदेच्या हद्दीत आहे की, माहिम ग्रामपंचायतीच्या असा कागदी संभ्रम निर्माण करून तहसिलदार पालघर यांच्या कार्यालयाला अतिक्रमण नक्की कुठल्या हद्दीत आहे याची शहानिशा करण्याकरीता 25/01/2022 जा.क्र.पा न प/कार्या-0407/2021-22 रोजी मुख्याधिकार्‍यांनी तहसिलदारांना पत्र दिले होते.
अतिक्रमणावर कारवाई न करण्याकरीता मुख्याधिकारी व तहसिलदार पालघर हे   जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने 10 फेब्रुवारी 2022 रोजी पासून संघटनेच्या वतीने पालघर तहसिलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचे संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना कळविण्यात आले.
त्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी पुन्हा 3 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाला जा.क्र.पा न प-कार्या/596/2021-22 पत्र लिहिले आहे. तहसिल कार्यालयाला दिलेल्या या दोन्ही पत्रावर 25/01/2022 च्या पत्रावर लिपिक तहसिलदार पालघर असा शिक्का असुन 3 फेबु्रवारी रोजीच्या पत्रावर लिपिक तहसिलदार पालघर व आवक-जावक चा शिक्का आहे.
25/01/2022 चे पत्र हे उमाकांत पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने तहसिलदारांना दिले असल्याचे सहायक नगररचनाकार रोशनी तामखडे यांनी स्वत: फोन करून आम्हाला सांगितले. मात्र रोशनी तामखडे यांच्या म्हणण्यानुसार हे पत्र व या पत्रावर उमाकांत पाटील यांची सही नसुन स्वत: मुख्याधिकार्‍यांनीच सही केलेली आहे. म्हणजेच रोशनी तामखडे यांच्या म्हणण्यानुसार मुख्याधिकारी यांनी तहसिलदारांना चुकीच्या पद्धतीने पत्र लिहीले आहे. तर 03 फेब्रुवारीला उमाकांत पाटील यांच्या सहीने तहसिलदारांना पत्र लिहुन त्या पत्रावर मुख्याधिकार्‍यांच्या मान्यतेनुसार असे म्हटले आहे.
व सदर पत्रावर तहसिल कार्यालयाचा आवक जावक क्रमांकाचा शिक्का मारण्यात आलेला आहे. याचा अर्थ 25 जानेवारीचे तहसिलदारांना दिलेले पत्र हे अद्याप पर्यंत इनवर्ड झालेले नाही. म्हणजेच तहसिल कार्यालयाला पत्र देऊन वेळ काढू धोरण राबविण्याचा हा मुख्याधिकारी व सहायक नगररचनाकार यांचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.
पालघर नगरपरिषदेत रोशनी तामखडे या सहायक नगररचनाकार म्हणून नियुक्त आहेत. मात्र त्यांना सर्वे नं-48 ही जमीन नगरपरिषदेच्या आरक्षित भुखंडावर असुनही त्या बेजबाबदारपणाने ज्या जमिनीचा तक्रारीशी काहीही संबंध नसताना आपल्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करत खोटा व दिशाभुल करणारा अहवाल मुख्याधिकारी सह तहसिलदारांना कळवत आहेत.
त्यामुळे सहायक नगररचनाकार रोशनी तामखडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असुन येत्या 10 फेबु्रवारीला तहसिलदार कार्यालय पालघर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने बेजबाबदार तहसिलदार व बेजबाबदार मुख्याधिकारी, सहायक नगररचनाकार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here