Home विदर्भ गडचिरोली सामान्य रुग्णालयात घरगुती गॅसचा अवैधरीत्या वापर… जिल्हाधिकारी कडे तक्रार करून सुध्दा...

गडचिरोली सामान्य रुग्णालयात घरगुती गॅसचा अवैधरीत्या वापर… जिल्हाधिकारी कडे तक्रार करून सुध्दा कारवाई करण्यास दुर्लक्ष…

156
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली सामान्य रुग्णालयात घरगुती गॅसचा अवैधरीत्या वापर…
जिल्हाधिकारी कडे तक्रार करून सुध्दा कारवाई करण्यास दुर्लक्ष…
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):गडचीरोली जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जेवण तय्यार करणाऱ्या ठेकेदाराच्या स्वयंपाकघरात घरगुती गॅस चा वापर होत असल्याची तक्रार, शहरातील सहा पत्रकारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.घरगुती गॅससर्व सामान्य जनतेला फायदा व्हावा या साठी, 14 किलोचा गॅस सिलेंडर वर सबसिडी म्हणून काही रक्कम केंद्र सरकार तर्फे सिलेंडर धारकांच्या खात्यात थेट जमा केले जातात.पण या सबसिडी चा गैरवापर सामान्य रुग्णालय प्रशासनानेच केला असल्याचा, विदारक वास्तव सत्य आज पत्रकारांनी उघडकीस आणला आहे.
आज गडचिरोली सामान्य रुग्णालयात घरगुती वापराचे 20 ते 25 सिलेंडर असल्याची तक्रार
जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या कडे चार वाजेच्या सुमारास करण्यात आल्यावर सुध्दा,पुरवठा अधिकाऱ्याला कारवाई करण्यासाठी पाठवितो असे सांगून,कोणतीही कारवाई केली नाही.या वरून जिल्हा प्रशासन, हा माफियांचा पाठीराखा असल्यासारखे भूमिका घेतली की काय असे वाटू लागले आहे.घरगुती सिलेंडर वापरावर शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांना विचारणा केली असता, त्यांनी कलेक्टर यांना तक्रार केली आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना बघून घेऊ अशी मुजोरी पत्रकारांसमोर दाखविलेली आहे.पत्रकारांच्या तक्रारीवर,सामान्य रुग्णालयाच्या स्वयंपाक करणाऱ्या ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनावर, आवश्यक वस्तू अधिनियम कलम 3,7 या प्रमाणे फौजदारी कारवाई करण्याची गरज असताना सुध्दा जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी,आणि तहसीलदार यांनी कारवाई करण्यास मुद्दाम दुर्लक्ष केल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सामान्य रुग्णालयात घरगुती गॅस सिलेंडर चा वापर होत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्या कडे केली असता ,जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत,या साठी पोलिस यंत्रणा काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here