Home विदर्भ कोविडचे डोस न घेतलेला रुग्ण ऑक्सीजनवर ; पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

कोविडचे डोस न घेतलेला रुग्ण ऑक्सीजनवर ; पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

146
0

राजेंद्र पाटील राऊत

कोविडचे डोस न घेतलेला रुग्ण ऑक्सीजनवर ; पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

मंगरुळपीर,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- वाशिम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा कोविड रूग्णालयात एकूण तीन रुग्ण भरती आहे. एका रुग्णाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेली आहे. दुसऱ्या रुग्णाने मात्र एक डोस घेतला आहे. तिसऱ्या रुग्णाने तर कोविड लसीची एकही डोस न घेतल्यामुळे त्याला भरती करते वेळी त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. हा रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत भरती झाला होता. या रुग्णाला सतत ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोवीड लस न घेतल्यामुळे रुग्णाची झालेली ही अवस्था बघता १५ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लसीकरण करावे.
सध्या वाढत्या कोरोना व ओमायक्रोन विषाणूचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात पात्र व्यक्तीचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.कोवीड लसीकरणामुळे कोवीड संसर्ग झाला तरी कोरोना आजार होण्याचे प्रमाण कमी आहे.
जागतिक महामारी ठरलेला कोरोना संसर्गामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीना गमावण्याची वेळ आली. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी दिवस-रात्र मेहनत करून कोरोनाचा संसर्ग रोखणारी लस विकसित केली.
देशात १६ जानेवारी २०२१ पासून कोवीड लसीकरणाला सुरुवात झाली पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती येत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र व्यक्तीचे लसीकरण झाले आहे. यामध्ये विशिष्ट कालावधीत घेतलेल्या दोन लसीचा समावेश आहे. मात्र काही व्यक्तींनी लसीबाबत गैरसमज करून घेतले. तर काहींनी अफवांमुळे लस घेतली नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय येथे कोरोना वर उपचार घेत असलेल्या ज्या एका रुग्णाने कोविड लसीची एकही लस घेतलेली नाही. त्यामुळे तो रुग्ण आज ऑक्सीजन वर आहे. ही वेळ भविष्यात कोणावर येऊ नये. यासाठी पात्र व्यक्तीने कोविड लसीचा दोन्ही डोस निर्धारित वेळेत घ्याव्यात. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धर्मपाल केळकर यांनी केले आहे.

Previous articleदवाखान्यात जाते सांगून घरातून महिला बेपता सटाणा तालुक्यातील घटना
Next articleराष्ट्रवादीचे विविध ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here