Home नांदेड राष्ट्रवादीचे विविध ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण

राष्ट्रवादीचे विविध ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण

202
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रवादीचे विविध ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण

नांदेड -(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )

राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री कमल कदम साहेब,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब,युवक प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांच्या संकल्पनेतून गाव तेथे शाखा पालकांचे अनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा व पक्षाचा कार्येकर्ता तयार करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 या रोजी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी मुकनर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यातील सलगरा(बु.) केरूर, उमरदरी,पळसवाडी, कोळनूर, हसनाळ, हातराळ, गु.दापका, मुक्रमाबाद,व गोजेगाव आदी गावच्या फलकांच्या अनावरणाचे उद्घाटन हे प्रदेश सरचिटणीस व नांदेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पक्षनिरीक्षक निशांतभाऊ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख अतिथी म्हणून नांदेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष धनंजयभाऊ सूर्यवंशी,महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, मुखेड रा.कॉ.ता.अध्यक्ष शिवाजी जाधव साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी मुकनर, नांदेड रा.कॉ.सो.मी.जि.अध्यक्ष शेख शादुलभाई हे होते.फलकाचे अनावरण झाल्यावर सर्व शाखा अध्यक्ष व सर्व कार्यकारणीचे . मुखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक शंकर पाटील सलगरकर,शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, युवक विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर,विधानसभा अध्यक्ष बालाजी चापेकर, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड,ता.सचिव लक्षमन सोमवारे,गंगाधर चामलवाड, युवक ता.अध्यक्ष रमाकांत हिवराळे, महिला ता.अध्यक्ष पंचफुलाताई बिराजदार,आनंदा शिंपाळे बबलू देवकते,बाबा मणियार, अमोल पाटील गोजेगावकर,मगदूम पठाण, आदी सह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

Previous articleकोविडचे डोस न घेतलेला रुग्ण ऑक्सीजनवर ; पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन
Next articleवंटेकर दांपत्याचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here