Home Breaking News देगलूर भाजपा च्या सेवा सप्ताह दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप – गुणवंत...

देगलूर भाजपा च्या सेवा सप्ताह दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप – गुणवंत विद्यार्थ्यांचा ही सत्कार

94
0

देगलूर भाजपा च्या सेवा सप्ताह दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप – गुणवंत विद्यार्थ्यांचा ही सत्कार

नांदेड, दि. 26 ; राजेश एन भांगे

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या सौजन्य सप्ताह राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने देगलूर येथे दिव्यांग व्यक्तींना लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विधार्थ्याना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

भाजपाच्या सेवा सप्ताह दिनानिमित्त तालूका व शहर भाजपाच्या वतीने शहरातील गोविंद माधव मंगलकार्यालयात गुरुवारी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपचे जिल्हासरचिटणीस माधवराव पाटील उच्चेकर, श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक
श्री राजेश महाराज देगलूरकर,
जिल्हा चिटणीस शिवकुमार देवाडे, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पबीतवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख करडखेडकर, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, नगरसेवक प्रशांत दासरवाड आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.

तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना वाॅकर, काठी व चश्म्याचे वाटप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व इतर जिल्हास्तरीय भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विधार्थ्याना खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यात्मिक आघाडीच्या राज्य समन्वयकपदी राजेश महाराज देगलूरकर
यांची निवड करण्यात आल्याने त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे शहरसरचिटणीस कृष्णा जोशी, गंगाधर दाऊलवार, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक डुकरे, शिवाजी इंगळे, सुरज मामीडवार, मल्लिकार्जुन पाटील, शिवराज हांडे, किशन पांचाळ, मारोती पुलचवाड, अॅड श्रीकांत कोम्पले, कैलाश वंटे, शिवकांत धडेले, बालाजी पाटील थोटवाडीकर, गंगाधर दोसलवार, बाबू भंडरवार आदिसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले

Previous articleमालेगाव परिसर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Next articleमनपाडळे गावातील शेतकऱ्यांच्या नशीबी कसरतीचा रस्ता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here