Home Breaking News मालेगाव परिसर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मालेगाव परिसर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

84
0

मालेगाव परिसर
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
एके वेळी पावसाची वाट बघत बसलेला शेतकरी आता पावसाच्या सारख्या पडण्याला वैतागला आहे त्यातच पावसाने अजून शेतकऱ्याला त्याच्या हतातोंडी आलेला घास मका,भुईमुग,कांद्याचे ऊळे आणि ठीक ठिकाणी लागवड केलेला कांदा पूर्ण पणे जमीनदोस्त केला आहे.आता शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे १५००० रुपये भावाने पायली भर कांद्याचे बियाणे घेवून ही ते बियाणे पावसाच्या पाण्याने जमीनदोस्त झाले आहे. इतकी महागाई असताना सगळ्या पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्याचे आज खऱ्या अर्थाने कंबर तुटले आहे. सरकारकडे शेतकरी जर आशेने बघायला लागला तर सरकारचे लोक म्हणतात की एव्हढे असूनही रडतात साले, तेव्हा शेतकऱ्याने आपले दुःख आणि झालेले नुकसान ह्या बाबतीत सरकारला काही सांगावे की नाही हा प्रश्न पडतो आहे.
आता शेतकरी हा मनाला पटत नसले तरी सरकारच्या तूट पुंजा मदतीची आस लावून बसला आहे. कारण घरातले त्याने सगळे शेतात टाकुन उगवले आणि ते पावसाने पुन्हा मातीत मिसळवले…
युवा मराठा विभागीय संपादक निंबा जाधव

Previous article*दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा व डाळिंब पिकाचे प्रचंड नुकसान*
Next articleदेगलूर भाजपा च्या सेवा सप्ताह दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींना साहित्याचे वाटप – गुणवंत विद्यार्थ्यांचा ही सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here