Home विदर्भ घरकुल याद्या मध्ये वगळण्यात आलेल्या गरजू लोकांना तात्काळ समाविष्ट करा…..

घरकुल याद्या मध्ये वगळण्यात आलेल्या गरजू लोकांना तात्काळ समाविष्ट करा…..

107
0

राजेंद्र पाटील राऊत

घरकुल याद्या मध्ये वगळण्यात आलेल्या गरजू लोकांना तात्काळ समाविष्ट करा…..!
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
जळगाव जा. :- सन २०१६ /१७ या वर्षातील सर्वेक्षणानुसार जळगाव जामोद तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील समाविष्ट गावांमधील गरजू लोकांची यादी पंचायत समिती कार्यालयात प्राप्त झाली होती.

त्यानंतर आता प्रकाशित झालेल्या प्रपत्रक ड यादी मध्ये तालुक्यातील असंख्य गरजू लोकांना वगळण्यात आले आहे.

मुळात या तालुक्याची ओळख ही आदिवासी दुर्गम भाग म्हणून आहे. आणि या तालुक्यामध्ये शेतीच्या उत्पन्नावर व्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाचे स्त्रोत नाही.

त्यामुळे या जळगाव जामोद तालुक्यामध्ये अशी काही गरीब कुटुंब आहेत की त्यांच्या घराच्या भिंती पडलेले अनेकांचे विटा मातीचे, काडी कचऱ्यांची आहेत. आणी अशा लोकांना यामधून वगळणे हे एक प्रकारे गरिबावर अन्यांय करणारे आहे.

या गरीब गरजू लोकांवर अन्याय होऊ नये याकरता अक्षय पाटील यांनी घरकुला पासून वंचित असणाऱ्या लोकांना व कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गट विकास अधिकारी यांना संपूर्ण माहिती दिली.

गटविकास अधिकारी यांच्याशी फोनवर संभाषण झाल्यानंतर आपण आपल्या पातळीवर सर्वेक्षण करू असे सांगण्यात आले.

त्यानंतर विस्तार अधिकारी श्री मोरे साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली.

यावेळी वैभव जाणे, शुभम रोठे, अजय गिरी, विनायक पाटील, ज्ञानेश्वर चोपडे, भगवान पाटील, तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमुखेडच्या लोकसंकेत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. मुखेडच्या नावलौकिकतेत आनखीन भर
Next articleबच्चू कडू जिंकले, पण चर्चा ‘भुताची’ ; यशोमती ठाकुरांना डिवचलं
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here