Home नांदेड मुखेडच्या लोकसंकेत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. मुखेडच्या नावलौकिकतेत आनखीन भर

मुखेडच्या लोकसंकेत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. मुखेडच्या नावलौकिकतेत आनखीन भर

103
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेडच्या लोकसंकेत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

मुखेडच्या नावलौकिकतेत आनखीन भर
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

पुणे : मराठीबोली दिवाळी अंक स्पर्धेत ‘सृजन’आणि ‘अक्षरधारा’या दिवाळी अंकांना विभागून प्रथम क्रमांक मिळाला आहे.तर द्वितीय क्रमांक विभागून ‘वारसा’आणि’ कृषीवेल’अंकांना जाहीर झाला आहे.तृतीय क्रमांक विभागून ‘लोकसंकेत ‘आणि ‘लोकप्रभा ‘ला मिळाला आहे . जनस्तंभ,दर्यावर्दी,शुभम, शब्दशंकरपाळी,लोकसेवक, स्नेहदा,आघाडी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे . स्पर्धेचे पुरस्कार वितरण ३० . जानेवारीला दुपारी चार वाजता डेक्कन जिमखाना येथील मराठा मित्र मंडळ कॉलेजच्या सभागृहात होईल असे मराठीबोलीच्या उपाध्यक्षा रजनी घोंगडे यांनी कळविले आहे .
मुखेड नगरीत अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या लोकसंकेत या साप्ताहिकाच्या यशस्वी वाटचालीस व राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळविल्याबद्दल लोकसंकेतचे मुख्य संपादक नामदेव यलकटवार यांचे सर्वत्र कौतुक होत असून याबद्दल TV सह्याद्री न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल पाटील येवतीकर तरुण भारतचे पत्रकार संजय कांबळे , सामनाचे पत्रकार सुशिल पत्की , युवा मराठा न्यूजचे मनोज बिरादार, पुण्यनगरीचे पत्रकार संदीप कामशेटे, सकाळचे पत्रकार सुनील पौळकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकुख्यात निलेश घायवळ टोळीमधील ६ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई 🛑
Next articleघरकुल याद्या मध्ये वगळण्यात आलेल्या गरजू लोकांना तात्काळ समाविष्ट करा…..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here