Home पुणे कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील ६ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई...

कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील ६ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई 🛑

118
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कुख्यात निलेश घायवळ टोळीमधील ६ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई 🛑
✍️ पुणे : विलास पवार ( पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :-⭕ शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ
टोळीतील 6 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील कोथरुड
पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांनी आजपर्यंत 65 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख मयुर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय-27 रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), ओंका उर्फ चिक्या शाम फाटक (वय-23 रा. माथवड चाळ, ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड), मनिष रामकृष्ण माथवड (वय-22 रा. गणेश कॉलनी, गणंजय सोसायटी, कोथरुड), गणेश सतीश राउत (वय-23 रा. नवएकता कॉलनी, हमराज मित्र मंडळासमोर, कोथरुड), समिर खेंगरे, रावण उर्फ तुषार पोळेकर यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कुख्यात निलेश घायवळ टोळीतील सदस्य आणि टोळी प्रमुख राकेश कुंबरे आणि त्याच्या साथिदारांनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळी वर्चस्व व दहशत माजवण्यासाठी खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, विना परवाना शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.
गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 65 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी , प्रविण कुलकर्णी , पोलीस नाईक भास्कर बुचडे, पोलीस शिपाई अजय सावंत यांनी केली.

Previous articleनायगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव,कॉंग्रेसचे सतराही उमेदवारांचा दणदणीत विजय.
Next articleमुखेडच्या लोकसंकेत दिवाळी अंकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर. मुखेडच्या नावलौकिकतेत आनखीन भर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here