Home विदर्भ बच्चू कडू जिंकले, पण चर्चा ‘भुताची’ ; यशोमती ठाकुरांना डिवचलं

बच्चू कडू जिंकले, पण चर्चा ‘भुताची’ ; यशोमती ठाकुरांना डिवचलं

155
0

राजेंद्र पाटील राऊत

बच्चू कडू जिंकले, पण चर्चा ‘भुताची’ ; यशोमती ठाकुरांना डिवचलं                                                                   ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही.
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बच्चू कडू आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नवा वाद रंगला आहे. निवडणुक प्रचारा दरम्यान दोघांनी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप केल्याचे मतदारांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या प्रचारसभेतील ‘भूतांची’ चर्चा सध्या विदर्भात सुरु आहे.
बच्चू कडूंचा ‘प्रहार’, एकहाती सत्ता ; भाजपला भोपळा
नगरपंचायतीच्या प्रचारात यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांची संग्रामपूर येथे एकाच दिवशी प्रचार सभा झाल्या. सकाळी यशोमती ठाकूर यांची तर सायंकाळी बच्चू कडू यांची सभा झाली. सकाळच्या सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या की, “आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे..!” त्यानंतर सायंकाळी बच्चू कडू यांनी आपल्या प्रचारसभेत या टीकेला उत्तर दिले होते.
ते म्हणाले, “मी साधं सुध भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे..!” याच आरोप-प्रत्यारोपात चर्चा असताना बच्चू कडू यांनी टि्वट करीत पुन्हा एकदा त्या सभेची आठवण यशोमती ठाकुर यांना करुन दिली आहे.
राष्ट्रवादीत गेलेल्या रुपाली ठोंबरेंनी केलं मनसेच्या उमेदवारांचे अभिनंदन
“भूत” लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवून देऊ. निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद,” असं बच्चू कडू यांनी टि्वट करीत यशोमती ठाकुर यांना डिवचलं आहे.
बुधवारी बच्चू कडू म्हणाले, ”आम्ही फार कमी जागा लढविल्या आहेत. पण आम्हाला ७५ टक्के यश मिळाले आहे. दहा-वीस वर्षापूर्वी झालेली पक्ष बांधणी त्याला आज जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रत्यांनी केलेली मेहनत महत्वाची आहे. आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. एकूण जागा लढविल्या कमी, पण यश मात्र जास्त मिळाले आहे,”

”राजकारण हे जाती-पाती, धर्म, झेंड्यावर होत नाही, आम्हाला ते सिद्ध करुन दाखवायचे आहे की मंदिर-मशिद असे विषय घेऊन उपयोग नाही, आम्ही सेवेचा विषय घेऊन लोकांमध्ये गेलो. त्याला प्रतिसाद मिळत आहे. हा सेवेचा अजेंठा घेऊन आम्ही महाराष्ट्र घेऊन जात आहोत. सेवेचा अजेंठा घेऊन तुम्ही जनतेत गेलो तर यश नक्की मिळते. येत्या जिल्हापरिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या सोबत कोणी आले तर ठिक आहे, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू,” असे बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here