Home गुन्हेगारी पत्रकारावर अवैध धंद्यावाल्यांचा प्राणघातक हल्ला; डांगसौंदाणे बुंधाटेत “दाऊद”चा बोलबाला,सटाणा पोलिसांचा कारभार ढिल्ला..!!...

पत्रकारावर अवैध धंद्यावाल्यांचा प्राणघातक हल्ला; डांगसौंदाणे बुंधाटेत “दाऊद”चा बोलबाला,सटाणा पोलिसांचा कारभार ढिल्ला..!! वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा!!

415

राजेंद्र पाटील राऊत

पत्रकारावर अवैध धंद्यावाल्यांचा प्राणघातक हल्ला; डांगसौंदाणे बुंधाटेत “दाऊद”चा बोलबाला,सटाणा पोलिसांचा कारभार ढिल्ला..!! वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांवनाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या व डांगसौंदाणे औट पोलिस स्टेशनच्या कक्षेत असलेल्या बुंधाटे येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाजवळ सट्टामाफीया “दाऊद”चा मोठाच धुमाकूळ सुरु असून,या सट्टा माफीयाला नेमका आशिर्वाद कुणाचा?असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सट्टा मटका जुगार हे एक असे व्यसन आहे की,जो व्यक्ती एकदा या मार्गाला गेला की,त्याच्या संसाराची राखरांगोळी होण्यास वेळ लागत नाही.तरीदेखील सट्टामाफीया राजकारणात सक्रीय असलेल्या डांगसौंदाणे बुंधाटे सारख्या भागात आपल्या सट्टा मटकाचे साम्राज्य थेट शिक्षणाचे पवित्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तीगृहाजवळच बिनधास्तपणे चालवितो तरीही पोलिस प्रशासन अशा या अवैध धंंद्याकडे गांभिर्याने न बघता कारवाई करण्यास कुचराई करतात म्हणूनच तर पत्रकारांनी लिखाण करुनही फारशी मोठी कारवाई न करता पोलिस प्रशासनाची डोळेझाक सुरु आहे.मध्यंतरी अशाच अवैध सट्टा मटका माफीया विरोधात लिहल्यामुळे डांगसौंदाणे येथील पत्रकार हेमंत चंद्रात्रे यांचेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता;मात्र त्यांना न्याय मिळाला किंवा नाही हा प्रश्न जरी अनुतरीत असला तरी भविष्यकाळात हा आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे एक मोठे साम्राज्य निर्माण होईल व त्याची मोठीच डोकेदुखी पोलिस प्रशासनाला होण्याची शक्यता आहे.कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस प्रमुख पाटील साहेब यांनी तरी निदान या अशा सट्टा माफीया दाऊदच्या कायमस्वरुपी मुसक्या आवळाव्यात की,जेणेकरुन विद्यार्थ्यांसोबतच गोरगरीब आयाबहिणींचा संसार उध्वस्त होणार नाही,मात्र सट्टा माफीयाच्या अवैध मिळकतीवर सगळेच पोळी शेकून घेणारे तथाकथित पत्रकार,पोलिस प्रशासनातील काही चिरीमिरी घेणारे देखील अशा या अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा मटका व्यवसायाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.करोडपतीचा रोडपती झालेला दाऊदचा खरा इतिहास असा आहे की,एकेकाळी नाशिक जिल्ह्यात सट्टा मटका अवैध धंद्याचा बेताज बादशहा म्हणून ओळखला जाणारा हा दाऊद करोडपतीचा कफल्लक व कंगाल होऊन रोडपती झाला,त्यानंतर त्याने काही काळ देवळ्याजवळ भाबडबारीत आपला तळ ठोकून बस्तान मांडले.आणि आता हाच दाऊद डांगसौंदाणे बुंधाटेत आपल्या अवैध धंद्याचे साम्राज्य वाढवून पोलिसांना खुले आव्हान देत आहे हे विशेष! बुंधाटे येथे असलेल्या आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे भविष्य बिघडण्यापुर्वीच दाऊदचचा हा अड्डा पोलिस प्रशासनाने तात्काळ उध्वस्त करुन त्याचेवर कठोर कारवाई करावी अशीच माफक अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदला पकडून आणायला जरी शासनाला अद्याप यश आले नसले तरी उद्या तसाच दाऊद या डांगसौंदाणेत तयार होऊ नये म्हणून पोलिसांनी शीघ्रतेने पाऊले उचलावीत म्हणजे झाले.

Previous articleबच्चू कडू जिंकले, पण चर्चा ‘भुताची’ ; यशोमती ठाकुरांना डिवचलं
Next article10लाखाची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलिस कॉन्स्टेबल जाळ्यात .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.