Home नांदेड प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांच्या ‘पर्यावरण शास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन संस्थेचे सचिव...

प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांच्या ‘पर्यावरण शास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन संस्थेचे सचिव मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते संपन्न

203

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0037.jpg

प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांच्या ‘पर्यावरण शास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन संस्थेचे सचिव मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते संपन्न
मुक्रमाबाद/अप्पा वटंगिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
मुक्रमाबाद येथे राष्ट्र माता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 30 मे रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संस्थेचे सचिव मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांनी लिहिलेल्या ‘पर्यावरण शास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी ‘पर्यावरण शास्त्र’ हा ग्रंथ येणार्‍या नवीन पिढीला पर्यावरण जागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे असे मत व्यक्त केले.
या छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मा.म. गायकवाड, डॉ विलास पवार ,प्रा.भारत भूषण बाळबुधे, डॉ भारत मुस्कावाड, श्री चंद्रकांत पाटील, श्री संतोष पाटील हे होते. तसेच या वेळी डॉ रमाकांत बिडवे, डॉ बालाजी खराबे, डॉ सूर्यकांत सकनुरे,डॉ एकनाथ भिंगोले, प्रा अंकुश शिंदे, रामदास मदळे ,प्रा रविन्द्र बावीस्कर,डॉ शेख गणी,डॉ काळे दिलीप, डॉ जितेंद्र काळे, श्री उमाकांत गायकवाड आदी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मौलाना सय्यद तर या कार्यक्रमात प्रास्ताविक विचार डॉ विवेक इनामदार यांनी मांडले.या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वाचे आभार प्रा नारायण पांचाळ यांनी मानले.

Previous articleराष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सचिव पदी आशिष बकाल
Next articleभारत सरकाच्या सर्व कल्याणकारी योजना अखेरच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बॅंकानी ऐक चॅलेंज म्हणून स्वीकारावी।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.