Home मुंबई मंत्रालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

मंत्रालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

116
0

राजेंद्र पाटील राऊत

मंत्रालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

मुंबई (अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

महाराष्ट्राचे कामकाज जिथून चालते,राज्याचा गाडा सुरळीत चालविला जातो त्या मंत्रालय येथे दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केला आहे.
मराठी विभागाच्या पुढाकाराने दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रम मंत्रालय त्रिमूर्ती दालनात राबविले जात आहेत.
ज्या मध्ये प्रामुख्याने शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाचा प्रयोग सर्व मंत्रालय अधिकारी /कर्मचारी यांना मोफत दाखवण्यात येत आहे. त्या सोबत मराठी भाषेचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या उपक्रमअंतर्गत दाखविले आहे.
या सप्ताहाचे उद्घाटन मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई,राज्याचे मुख्य सचिव,यांनी केले. गेल्या काही दिवसात मराठी भाषेचा वापर हा सर्व दुकाने आस्थापना यांचा पाट्या सुद्धा मराठी भाषेत असाव्यात असा आदेश ठाकरे सरकार ने काडला आहे.
सर्व उप्रक्रमात लक्ष्यवेधी ठरलेल्या गोष्टी म्हणजे उत्कृष्ठ अशी रांगोळी, मराठी भाषा दालन, सर्व प्रमुख भारतरत्न, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मान्यवर,संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी यांचा प्रतिकृती उभारण्यात आले आहेत.
त्यामुळे पुढे देखील असाचा मराठी भाषा व आपली संस्कृती जपण्याची गरज व त्याविषयी चे प्रयत्न राज्य सरकार कडून होताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here