Home विदर्भ पंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे जिल्हाध्यक्ष महेंद्र...

पंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी

189
0

राजेंद्र पाटील राऊत

पंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप नेत्या विरोधात गुन्हे दाखल करावे

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मागणी

 

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मा. प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले हे जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात असताना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत त्यांच्या कडे तक्रारी केल्या, यावेळी नागरीकांशी बोलत असताना प्रांताध्यक्ष यांनी, आपण मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो असे म्हटले होते. मात्र या घटनेचा व्हिडीओ वायरल करून त्याचा पंतप्रधान मोदींशी संबंध भाजप नेते जोडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. मा.प्रांताध्य्क्षांनी स्वतः या बाबतीत स्पष्ठपणे खुलासा करून आपण स्थानिक गुंड मोदीबाबत बोलत होतो. पंतप्रधान मोदी बाबत नाही असे सांगितले आहे.

तरीही राज्यातील भाजप चे नेते जाणीवपूर्वक स्थानिक गावगुंड मोदीबाबत केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधानाचा संबंध जोडून पंतप्रधान पदाचा व त्या पदाच्या गरीमेचा अपमान करीत आहेत. हि अत्यंत गंभीर बाब आहे. असत्य कथन करून लोकांची दिशाभूल करणे, पंतप्रधान पदाचा अवमान करणे हा दखलपात्र गुन्हा असून यासाठी भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, प्रा.राजेश कात्रटवार, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया सेल महासचिव नंदूजी वाईलकर, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, नंदू कायरकर, घनश्याम वाढई, वसंत राऊत, नदीम नाथानी, राकेश रत्नावार, जीतेंद्र मूनघाटे, संजय चन्ने, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल एलट्टीवार, कुणाल ताजने, मनोज तोटपल्लीवार सह अनेक काँग्रेस नेते व पदादाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleवानखेड गाव ग्राम पंचायत च्या वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे 4 डिजिटल T V सेट भेट
Next articleमंत्रालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here