Home मराठवाडा गडचिरोली नगरपरिषदेचा सन २०२२-२३ चा शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

गडचिरोली नगरपरिषदेचा सन २०२२-२३ चा शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

250
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली नगरपरिषदेचा सन २०२२-२३ चा शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर

गडचिरोली- (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
स्थानिक नगरपरिषदेची शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीची विशेष सर्वसाधारण सभा मा. नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.१४ जानेवारी रोजी नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये पार पडली. सभेमध्ये नगरपरिषद महसूल विभाग व शासकीय अनुदान निधीचा शिल्लकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला.
यामध्ये नगरपरिषद महसूल विभागाचा ३१ कोटी,२लक्ष,५९ हजार,६३ रुपयांची महसूल रक्कम जमा होणार असुन,३० कोटी,९७ लक्ष,७५ हजार रुपये एवढी रक्कम खर्च होणार आहे.तर ४ लक्ष,८४ हजार ६३ रुपये एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे.शासकीय अनुदान निधीमधून १२३ कोटी,४० लक्ष,७९ हजार रुपये एवढी रक्कम जमा होणार असून ११५ कोटी,९८ हजार रुपये खर्च होणार आहेत.तर उर्वरीत ७ कोटी,४२ लक्ष,७९ हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे.
या पाच वर्षांमध्ये गडचिरोली शहरात बरेचसे विकास कामे झालेली असुन आजच्या अंदाजपत्रकामुळे गडचिरोली शहराच्या विकास कामांवर भर पडणार आहे.
सभेला उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षा नैताम,नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका रितु कोलते उपस्थित होते.
नप लेखापाल स्नेहल सेन्द्रे यांनी सन २०२२-२३ चा शिल्लकी अंदाजपत्रक व जमा-खर्च मांडला. यावेळी स्थायी समितीने सर्वानुमते मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here