• Home
  • *मराठा आरक्षण लागू होत नाही* *तोपर्यंत मेगा पोलीस भरती कशाला ?* *आमदार नितेश राणे*

*मराठा आरक्षण लागू होत नाही* *तोपर्यंत मेगा पोलीस भरती कशाला ?* *आमदार नितेश राणे*

*मराठा आरक्षण लागू होत नाही* *तोपर्यंत मेगा पोलीस भरती कशाला ?*
*आमदार नितेश राणे*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मराठा आरक्षण जोपर्यंत लागु होत नाही तोपर्यंत राज्यात होणारी मेगा भरती करणे म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. राज्यात
सर्वात मोठी पोलीस भरती करणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. मात्र त्या निर्णयाला मराठा राजकीय मंडळींकडून विरोध केला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या पोलीस भरती करणे हा चुकीचा निर्णय असल्याचं मत मराठा समाजाकडून व्यक्त केल्या जात आहे.
याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की, राज्यात इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी मेगा भरती होत आहे. सध्या न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मेगा भरती करणे हा निर्णय चुकीचा असल्याचं राणेंनी म्हटले आहे. जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेगा भरती कशाला?
असा सवाल सुद्धा राणेंनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकार आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचं मत; नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

anews Banner

Leave A Comment