Home नांदेड शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन...

शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

298

राजेंद्र पाटील राऊत

शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित
प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा
– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)  :- शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्यात मूल्याची वृद्धी होणार नाही. हे लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषि विभागाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत भोकर तालुक्यातील भोसी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या हळद, मसाले प्रक्रिया उद्योगास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गीते, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेतून लाभ देण्याचे निश्चित केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत साधारणत: 1 कोटी रुपयाच्या प्रकल्पासाठी 60 टक्के जास्तीत जास्त 60 लाख रूपयापर्यंतचे अनुदान देय राहणार आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत बारड येथील शेतकरी नवनाथ देशमुख यांनी लाभ घेतलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते रोपवाटीकेचे उद्घाटन करण्यात आले. या रोपवाटिकेत विविध प्रकारच्या मिरची, वांगी, टोमॅटो, टरबुज, खरबुज आदी फलोत्पादन पिकांची रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 75 भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला. एका रोपवाटीकेस 2 लाख 30 हजार अनुदान देण्यात येणार आहे. बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भेट देऊन स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. “विकेल ते पिकेल” या अभियानाअंतर्गत थेट विक्री केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.

Previous articleगडचिरोली नगरपरिषदेचा सन २०२२-२३ चा शिल्लकी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर
Next articleवादळी वाऱ्यासह आवकाळी पावसात झालेल्या गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. आ . डॉ . तुषारजी राठोड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.