• Home
  • विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांकडून निवेदने सादर

विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांकडून निवेदने सादर

विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांकडून निवेदने सादर (युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यात पावसा अभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील आदिवासी संघटनांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसासाठीचे निवेदने तहसीलदार सुरगाणा यांना देण्यात आले आहे.
याबरोबर सुरगाणा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी जे विलगीकरण कक्ष तयार केलेत त्यामध्ये अस्वच्छेता व निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जाते अशा तक्रारीचं निवारण व्हावं यासाठी आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सुरगाणा उपसभापती यांच्या उपस्थितीत देण्यात आली. दुष्काळ सदृश्य परस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश कृषी अधिकारी सुरगाणा यांना देण्यात आले. यावेळी उपसभापती इंद्रजित गावित, नगरसेवक भरत वाघमारे, आदिवासी बचाव अभियान सुरगाणा शाखेचे पदाधिकारी एन. एस. चौधरी, रतन चौधरी. डॉ. हिरामण गावित, दीपक चौहान, अशोक भोये, व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment