कोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार माजवला आहे, लोक भितीने मरत आहेत याचे एकच कारण आहे योग्य ती जनजागृती करण्यात आपण कमी पडत आहोत, बाधित झाल्याचा रिपोर्ट आला की आपण आता मेलो असे समजून घाबरुन जाऊ नका, मन खंबीर करा व आपण बरे होणार असा आत्मविश्वास बाळगा खचून जाऊ नका मित्रानो कोरोना आजारावर अजुन लस उपलब्ध नाही तरी आपण बघतो की बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत आहे आमच्या रावळगावचे नानाजी विक्रम जाधव व त्यांचे कुटुंब, निशांत बोरसे व कुटुंब, दिलीप वाघ हे यातून बरे होउंन घरी परत आले आहेत , कोरोना बाधित झालो आता आपण संपलो या भितीने नानाजी जाधव यांचा रक्तदाब वाढला होता त्यावेळी मी त्याला फोन करुन सांगितले अरे खुप बाधित रुग्ण बरे होत आहेत, घाबरु नको, तू पन बरा होशील आणी झाला देखील बरा त्यामूळे देवाने आपल्या शरिरात जी प्रतिकार शक्ती दिली आहे तिचा वापर करा मनोबल वाढवा सकरात्मक रहा फक्त काळजी घेतली की हा रोग बरा होईल व आपण नक्की मात करु यावर, कितेक लोक भितिपोटी आपले जिव गमावत आहेत, भरपूर व्यायाम करा, वेसना पासुन दूर रहा, परमेश्वरा वर विश्वास ठेवा, देवाने आपल्या शरिरात अनेक आजारावर युध्द करण्याची शक्ती दिली आहे ती जागृत करा, तिला चालना दया बघा मग आपण कसे या आजाराला पळवुन लावतो, मित्रांनो सध्याची भयावह स्थिती बघुन हे दोन शब्द लिहावे असे वाटले माझे सर्व समाजसेवक, जन प्रतिनिधि याना एकच सांगने असेल आपण जन जागृती केली पाहिजे कारण खुप मोठ्या प्रमाणावर जनता या बाबत गोधळली आहे, खुप लोक यातून बरे होउन आता निरोगी होत आहेत हे लोकांना समजले की नक्कीच लोकांचे मनोबल वाढेल व त्यांचा आत्मविश्वास वाढून प्रतिकार शक्ती वाढेल ही खुप महत्वाची बाब आहे.