Home माझं गाव माझं गा-हाणं उमराणे झाडी रस्त्यावर खून;परिसरात मोठ्ठी खळबळ

उमराणे झाडी रस्त्यावर खून;परिसरात मोठ्ठी खळबळ

127
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी ११ मे प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क

देवळा तालुक्यातील उमराणे येथील जुन्या झाडी रोड परिसरात राहणाऱ्या पंडित सखाराम देवरे वय 65 वर्ष यांचा निर्घुण खून झाल्याची घटना आज 10 मे रोजी उघडकीस आल्याने उमराणे सह परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवणकर, कळवणचे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड, देवळ्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली तसेच या ठिकाणी श्वानपथकाला पाचारण करून श्वान पथकाद्वारे संपूर्ण परिसराची तपासणी केली.

खून कोणी केला? व का केला? याबाबत देवळा पोलीस पुढील तपास करीत आहेत. उमराणे परिसरात खुनाची घटना झाल्याने जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला असेल याबाबत जनतेच तर्कवितर्क लावले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here