Home माझं गाव माझं गा-हाणं उंबरपाडा (सु)ता.सुरगाणा येथील प्रगती माध्य विद्यालयात लवकरच सुरू होणार ७२ बेडचे अत्याधुनिक...

उंबरपाडा (सु)ता.सुरगाणा येथील प्रगती माध्य विद्यालयात लवकरच सुरू होणार ७२ बेडचे अत्याधुनिक कोरोणा विलगीकरण सेंटर – मा.आमदार जे.पी.गावीत                 

186
0

राजेंद्र पाटील राऊत

उंबरपाडा (सु)ता.सुरगाणा येथील प्रगती माध्य विद्यालयात लवकरच सुरू होणार ७२ बेडचे अत्याधुनिक कोरोणा विलगीकरण सेंटर – मा.आमदार जे.पी.गावीत                              (पांडुरंग गायकवाड सुरगाणा तालुका प्रतिनिधी -युवा मराठा न्युज )

आज दिनांक ९ मे २०२१ रविवार रोजी उंबरपाडा(सु)ता.सुरगाणा जि.नाशिक येथे मा.आमदार कॉ.जे.पी.गावीत साहेब तसेच उपसभापती इंद्रजीत गावीत, संस्कार पगारिया, मोहनराव पवार, रामभाऊ थोरात, नितीन गावीत आमदा,पत्रकार बिरारी साहेब,प्रशांत दादा हिरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोणा विलगीकरण सेंटर ची पाहणी केली.हे कोरोणा विलगीकरण सेंटर अत्याधुनिक आणि स्वच्छ सुंदर अश्या वातावरणात तयार करण्यात आले आहे.तसेच आजुबाजुच्या गावांन पासुन व रहदारी पासुन दुर अंतरावर आहे.कोरोणा विलगीकरण सेंटर मध्ये ३६ स्वतंत्र रुम आहेत.एका रुम मध्ये फक्त दोनच पेशंट राहतील अशी व्यावस्था केली आहे.सेंटर मध्ये २४ तास स्वच्छ RO पाण्यासाठी नवीन फिल्टर व व्हॉटर कुलर मशीन खरेदी करण्यात आले आहे.तसेच २४ तास लाईट ची व्यावस्था करण्या साठी १५ KV चे (४.५०लक्ष किंमतीचे)नवीन जनरेटर बसविण्यात आले आहे.गरम पाण्यासाठी सोलर बसविण्यात आले आहे .त्याच बरोबर इतर साहित्य आणण्यासाठी गावीत साहेबांनी साधारण ९ ते १० लाख रुपये खर्च केले आहेत.सेंटर मध्ये दाखल झालेल्या पेशंट साठी दोन वेळचे जेवण व एक टाईम नाष्टा हे घरगुती पध्दतीने चुलीवर तयार करून दिले जाईल.त्याच बरोबर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उच्च प्रतीचे ॲंन्टी बायोटीक औषध शुध्दा दिले जातील.पेशंट लवकर तंदुरुस्त व्हावा म्हणून त्यांच्या आवडी प्रमाणे गवती चहा,अद्रक चहा,गुळाचा चहा,नागली ची आंबील,ज्वारीची आंबील आणि गावठी औषध म्हणून गुळवेल (गरवळ) काडा, अर्जुन सादडा ची साल, खोकल्यासाठी हिरडा,आंबु हळद ,जंगली मद तसेच इतर खुप सारे गुणकारी आयुर्वेदिक उपचार केले जातील.
सेंटर मध्ये दाखल झालेल्या पेशंट कढुन कुठल्याही प्रकारची फि आकारली जाणार नाही.हे सेंटर पुर्णतः निःशुल्क आहे.सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेल्या पेशंट ची HRCT करण्यासाठी खास वाहना द्वारे दिंडोरी किंवा नाशिक ला घेऊन जाऊन त्या पेशंट चा HRCT स्कोर तपासून पुढील उपचार करण्यात येतील.
सेंटर मध्ये सुरगाणा तालुक्यातील पेशंटना प्रथम प्राधान्य देऊन नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पेशंट साठी उपचार केले जातील.पेशंट बरोबर आलेल्या नातेवाईकांना राहण्याची व जेवणाची व्यावस्था दुर अश्या ठिकाणी निःशुल्क करण्यात आली आहे.ह्या कोरोणा विलगीकरण सेंटर चे खास वैशिष्ट्य हे आहे की,त्या ठिकाणी मा.आमदार जे.पी.गावीत व उपसभापती इंद्रजीत गावीत , धर्मेंद्र पगारीया ,हिरामण गावीत हे २४ तास उपस्थित राहुन पेशंट ची देखभाल करणार आहेत.त्यांच्या बरोबर तालुक्यातील तज्ञ डॉक्टर नर्स व तरुण स्वंयम सेवक सेवेसाठी दाखल होणार आहेत.
आम्ही तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व होम कॉरंटाईन झालेल्या कोरोणा पेशंटना विनंती करुन सांगतोय की,आपण येथुन पुढे घरी न रहाता.विलगीकरण सेंटर मध्ये दाखल होऊन उपचार करा.तरच आपण कोरोणा विरुद्ध ची लढाई जिंकू.

Previous articleउमराणे झाडी रस्त्यावर खून;परिसरात मोठ्ठी खळबळ
Next articleसंभाजी ब्रिगेड कामगार आघाडी नियुक्ती करण्यात आल्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here