Home माझं गाव माझं गा-हाणं संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी नियुक्ती करण्यात आल्या

संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी नियुक्ती करण्यात आल्या

123
0

राजेंद्र पाटील राऊत

———————————————–
संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी
नियुक्ती करण्यात आल्या
नाशिक,(राजेंद्र वाघ शहर प्रतिनिधी /युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रस्थापित घराणेशाही मोडून काढण्यासाठी व राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय आखाडयात उतरली आहे.
नेहमीच लोकांचे प्रश्न घेवून विरोधी पक्षाचे काम करत आहोत त्यामुळे प्रबोधनाचे काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष सुनिल शेवाळे
यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंतीचे
औचित्य साधून संभाजी ब्रिगेडच्या नाशिक कार्यालयांमध्ये बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
जिजाऊ पूजन व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तेजश भदाणे कोरोना काळात अहोरात्र मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश झाला.यावेळी महेश पाटील उपाध्यक्ष तेजश भदाणे सरचिटणीस पदी रोशन मोरे भुषण बोरसे मनोज पाटील यांची नाशिक शहर कार्यकारिणी जाहीर केली शिवश्री सुनिल शेवाळे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे कामगार आघाडी शहराध्यक्ष सुनिल शेवाळे यांनी शंभर टक्के समाजकारण शंभर टक्के राजकारण ही संभाजी ब्रिगेडची भूमिका समजावून सांगून जिजाऊ शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर ही विचारधारा लक्षात घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत याकरिता नाशिक संभाजी ब्रिगेडच्या वतीने मदत केंद्राची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश खरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here