Home कोल्हापूर हेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी

हेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी

201

राजेंद्र पाटील राऊत

हेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी

कोल्हापूर प्रतिनिधी : हेरले ( ता. हातकणंगले ) येथे तीन दिवसाचा लॉकडाऊन ग्रामस्थ व्यापारी व तरूण वर्गाच्या सहकार्याने कडकडीत यशस्वी झाला.
हेरले गावातील कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी उपाय योजना म्हणून ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीच्या वतीने २७ मे ते २९ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीने तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांना प्राचारण केले. त्यांनी पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून संचलन करीत ग्रामस्थांना घरी रहा सुरक्षित राहा असा संदेश देऊन प्रबोधन केले. तीन दिवस खासगी सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त घालीत चोख बंदोबस्त बजाविला. गावातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार , तरूण मंडळाचे कार्यकर्ते यांनीही लॉकडाऊनास प्रतिसाद दिला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. ग्रामस्थांनीही घरामध्ये राहून प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन दिवस गावात वर्दळ न होता शुकशुकाट होता.
पोलिस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहूल शेटे,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी होत तीन दिवसात गावात प्रबोधन संदेश देत लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous articleसटाणा तालुक्यात बेमोसमी पावसाने शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान
Next articleविजयसिंह यादव प्रतिष्ठान ने जपली सामाजिक बांधिलकी, जिल्हाध्यक्ष शिंदे 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.