Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा तालुक्यात बेमोसमी पावसाने शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान

सटाणा तालुक्यात बेमोसमी पावसाने शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान

294

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा (शशिकांत पवार युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा प्रतिनिधी) -तालुक्यातील पिंगळवाडे येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले दुपारी दोनच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वारे सुरू झाले त्यानंतर खूप जोराचा पाऊस होऊन अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा चाळीचे पत्रे उडाले, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे घराचे पत्रे उडून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे अनेक कुटुंब व त्यांचा संसार पाण्यात बुडाला या वादळी पावसामुळे या ठिकाणातील टोमॅटो डाळिंब ची रोपे भुईसपाट झाली. एन उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी थोडे थोडे पाणी वापरून जतन केलेली डाळिंब बाग भुईसपाट झाल्या पुन्हा या डाळिंब बागा चा बहार घेण्यासाठी शेतकऱ्यांना अजून एक वर्ष मेहनत घ्यावी लागेल व वाट बघावी लागेल
तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांची लागवड केली आहे या द्राक्ष बागांच्या देखील काही ठिकाणी मंडप कोसळले तसेच येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ओली तुरची तुर ची शेती केली जाते पण या वादळामुळे व पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाले शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्न काही क्षणात क्षणभंगुर होऊन या पावसात विरून गेली .अनेकांचे संसार उघड्यावर पडले होत्याचे नव्हते झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मोतीराम केदु भदाणे यांच्या शेताजवळ विजेचे खांब कोसळून पडला असून
सुदैवाने येथे कुठलीही जीवितहानी झाली नाही. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

“वर्षभरापासून पाण्याची कमतरता असताना देखील मी डाळिंब बाग फुलवली होती परंतु या वादळी पावसामुळे माझे लाखोंचे नुकसान झाले आहे तरी माझ्या बरोबरच आमच्या गावात गावातील व परिसरात खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आम्हाला यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी” *__अर्जुन दावल* *भामरे* , नुकसानग्रस्त शेतकरी

Previous articleमुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा मृत्यू
Next articleहेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.