Home कोल्हापूर विजयसिंह यादव प्रतिष्ठान ने जपली सामाजिक बांधिलकी, जिल्हाध्यक्ष शिंदे 

विजयसिंह यादव प्रतिष्ठान ने जपली सामाजिक बांधिलकी, जिल्हाध्यक्ष शिंदे 

89
0

राजेंद्र पाटील राऊत

विजयसिंह यादव प्रतिष्ठान ने जपली सामाजिक बांधिलकी,
जिल्हाध्यक्ष शिंदे

(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर)

पेठ वडगांव : येथील माजी नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या मार्गदर्शनाने स्व.विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांच्यावतीने कोरोना महामारीच्या संकटात लाँकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला फार मोठी झळ बसली आहे अशा गरजूंना मोफत जेवनाची सोय करून सामाजिक बांधिलकी जपली आहे असे प्रतिपादन भारतीय मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केले. आज शिंदे यांच्या हस्ते मोफत जेवनाचे पँकेट वाटप करण्यात आले.

यादव प्रतिष्ठान मार्फत गरजूंना एक हात मदतीचा एक घास आपुलकीचा हा उपक्रम दररोज शहरातील आबाजी चौकात   गरजू व्यक्तींना जेवणाचे पॅकेट दिली जात आहेत याचा लाभ शहरातील ३५० ते ४०० नागरिकांना दररोज होत आहे.

यावेळी अभिजीत गायकवाड म्हणाले  या  उपक्रमाबरोबरच यादव प्रतिष्ठान मार्फत  छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदीर वडगांव (कोविड सेंटर) येथील रूग्णांना ,व तेथील सर्व  वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील दोन वेळचे  जेवन दिले जाते तसेच भादोले ता.हातकणंगले येथील कोविड सेंटरला सकाळचे जेवन दिले जाते. तसेच या उपक्रमाने गरजूंना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील हुक्केरी, शाहू शिक्षण संस्थेचे अभिजीत गायकवाड (दादा), प्राचार्य प्रदिप पाटील , माजी उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस , राजेंद्र झगडे , रमेश पाटील , शंकर यादव , आप्पासाहेब पाटील , भिकाजी शिंदे ,बाळासो जंगम, नितीन शेटे , दशरथ सणगर  कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleहेरलेत तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन यशस्वी
Next articleचावरे गावात १४ जन कोरोना पाँझिटीव्ह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here