राजेंद्र पाटील राऊत
🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे किल्ले जयगड स्वच्छता मोहीम 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
रत्नागिरी:⭕ रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक,शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.
या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करुन शिवजयंती निमित्त किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करत आहोत.
तरी या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीच्या कणा-कणात ऐतिहासिक वास्तुचे संरक्षण व संवर्धन आणि समस्त महाराष्ट्रातील सर्व रयतेच्या मनामनात हे कर्तव्य जागविणे हा आमचा इरादा आहे.
तरी या आवतान सुपारीचा मान राखून अगत्य येण्याचे करावे. हे विज्ञापना जाणिजे. बहुत काय लिहिणे…
१९ फेब्रुवारी २०२१ सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० वा.
किल्ले जयगड, रत्नागिरी, महाराष्ट्र.
सेवेचे ठायी तत्पर
श्री. सुनिल अनंत धावडे
संस्थापक अध्यक्ष
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी.
भ्रमणध्वनी क्रमांक –
श्री. समीर अनंत धावडे (संघटक रत्नागिरी जिल्हा) – ९१३००८५४४१.
श्री. समीर श्रीपत गोताड (सचिव रत्नागिरी जिल्हा) – ९२८४१६७९३०. ⭕




