Home विदर्भ बालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी १२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

बालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी १२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

72
0

राजेंद्र पाटील राऊत

बालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी
१२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण

अकोला (सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: जिल्ह्यात महिला बालविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या बालगृहांमधील बालकांना महिला बालविकास विभागातर्फे आकाशदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंदाच्या दिवाळीत ही बालगृहे याच आकाशदिव्यांनी उजळली होती. या प्रशिक्षणात १२५ बालकांनी आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले व त्यांनी बनवलेल्या ५० हून अधिक आकाशदिव्यांनी ही बालगृहे दिवाळीत उजळली होती.

जिल्ह्यात महिला व बालविकास विभागांतर्गत ०४ बालगृह व ०१ शिशुगृह कार्यरत असुन काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके या बालगृहांमध्ये बालकल्याण समितीच्या आदेशाने दाखल आहेत. बालगृहातील बालकांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी या दिवाळीच्या सुटीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला व चाईल्ड लाईन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व बालगृहांमध्ये आकाश कंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या मध्ये सर्व बालगृहातील प्रवेशितांनी सहभाग घेतला खेळी मेळींच्या वातावरणात आकाश कंदील बनविण्याचे प्रशिक्षण घेतांना बालकांचा आनंद आणि उत्साह बघण्यासारखा होता. जो तो आपापला आकाश कंदील अत्यंत सुंदर आणि सुबक व्हावा, यासाठी प्रयत्न करीत होता. सर्व बालगृहात मिळून दाखल असलेल्या सुमारे १२५ बालकांनी हे प्रशिक्षण घेतले, या बालकांनी मिळून ५० आकाशदिवे तयार केले. दिवाळीत हेच दिवे बालगृहांवर लावण्यात आले. दिवाळीत बालगृहे याच आकाशदिव्यांनी उजळून निघाले.

जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुर्योदय बालगृह, गायत्री बालिकाश्रम,शासकीय बालगृह, आनंद बालिकाश्रम येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभीये व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी चाईल्ड लाईनचे विकास बनसोड, श्रीमती विद्या उंबरकर, कु.शिवानी यांनी प्रयत्न केले तसेच सूर्योदय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, शासकीय बालगृहाच्या श्रीमती वाढे, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भटकर, आनंद बालिकाश्रमाच्या तपोधीरा दिदी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleजिनिअस इंग्लिश स्कूल मध्ये ह्रदयस्पर्शी भाऊबीज स्नेह भोजन.
Next articleलासलगाव आगार, नासिक विभाग पुन्हा संपात सहभागी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here