राजेंद्र पाटील राऊत
जिनिअस इंग्लिश स्कूल मध्ये ह्रदयस्पर्शी भाऊबीज स्नेह भोजन.
कोल्हापूर ( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): पेठ वडगाव जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ह्रदयस्पर्शी भाऊबीज निमित्य स्नेहभोजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव व राहोबोथ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. गेली अनेक वर्ष दिवाळीचे औचित्य साधून समाजातील वंचितांसाठी फराळ व धान्य वाटप करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर महिलांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी भाऊबीजेचा सण असताना ही माता भगिनी या भाऊबीज सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. हा सर्व कार्यक्रम पाहून माता-भगिनी गहिवरल्या आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. यावेळी संस्थापक पुंडलिक पोळ, विद्या पोळ, प्राचार्य महेश पोळ, प्राचार्य अर्पणा पोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राहोबोथ संस्थेचे सुरेश माने, राजू जगताप, प्रकाश भंडारे, मोझेस चोपडे यांनी आयोजन केले होते.