Home बीड अंबाजोगाई तालुक्यात दोन अपघात; दोघांचा मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यात दोन अपघात; दोघांचा मृत्यू

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240123_072400.jpg

अंबाजोगाई तालुक्यात दोन अपघात; दोघांचा मृत्यू

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि:२२  तालुक्यात दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.एक घटना सायगाव गावाजवळ घडली तर दुसरी सातेफळ फाट्याजवळ घडली आहे.दरम्यान या दोन्ही घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.याबाबत फक्त माहिती अशी की,सायगाव येथे दिनांक २१ रोजी रविवार रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली.या धडकेत पंचेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.विजय सतीश कांबळे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी सतीश ज्ञानोबा कांबळे वय ५३ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालका विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सातेफळ फाट्यावर घडलेल्या दुसऱ्या अपघातात स्कॉर्पिओने मोटर सायकलला जोराची धडक दिली.या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जन गंभीर जखमी झाला आहे.रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडला आहे.अहमद नयुम शेख वय २१ राहणार शिराढोण असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.तर त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे नाव अद्याप समजलेले नाही.या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleघरफोडी करून साडे सहा लाखाचा ऐवज लंपास बंद घरात चोरी : ड्रीमलँड सिटी मधील घटना
Next articleरामराज्य प्रमाणेच राज्य चालवून जनतेला सुख- समृद्ध करावे- तिलक डुंगरवाल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here