Home पुणे ओम साई फाऊंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

ओम साई फाऊंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

426
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळे गुरव :(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) येथील ओम साई फाऊंडेशनच्या वतीने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून तसेच शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली निमित्त पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या परिसरात किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपळे गुरव येथील ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांनी दीपावली निमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १३४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले होते. तसेच उत्तेजनार्थ १० बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला पहावयास मिळाला.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : सोशल फाऊंडेशन विकास भागवत, जुनी सांगवी (प्रथम), अनंतनगर तरुण मित्र मंडळ, पिंपळे गुरव (द्वितीय), काशिद नगर मित्र मंडळ, पिंपळे गुरव (तृतीय), सिद्धेश देवकर, त्रिमूर्ती कॉलनी, नवी सांगवी (चतुर्थ), कोमल गौंडाडकर, विनायक नगर, पिंपळे गुरव (पाचवा) अशा पाच उत्कृष्ट किल्ला बनविलेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक, महापौर माई ढोरे यांनी स्पर्धकांना सांगितले की किल्ले बनवण्याआधी अथवा साकारत असताना किल्ल्यांची माहिती घेणे. सर्व ऐतिहासिक गड, किल्ले याबद्दल वाचन, अभ्यास करणे. यामुळे मुलांना इतिहासाची उजळणी व त्यांच्या ज्ञानात इतिहासा विषयी जागृती होण्यास मदत होईल.
याप्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की आमची संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम राबविण्याचा खरा उद्देश म्हणजे सदनिका, इमारती, सोसायटी यामध्ये ही पारंपरिक संस्कृती लुप्त होऊ लागलेली आहे. यासाठी दिवाळीमध्ये किल्ले बनविण्याची लहान लहान मुले, तरुण वर्ग, मंडळ यांच्यात आवड निर्माण व्हावी व त्यामागचा महाराजांचा इतिहास कळावा हाच त्यामागचा माझा खरा उद्देश आहे.
कार्यक्रम प्रसंगी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, भाजपा महिला प्रभाग अध्यक्ष कोमल गोंडाडकर, नवनाथ देवकर, शैलेश थोरात, सोनू सिंग, विजय पिल्ले आदी मान्यवर, स्पर्धक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भागवत यांनी केले. राजू आवळेकर यांनी आभार मानले.

Previous articleतामसवाडी ते शेगांव पायी दिंडीला प्रारंभ
Next articleजिनिअस इंग्लिश स्कूल मध्ये ह्रदयस्पर्शी भाऊबीज स्नेह भोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here