राजेंद्र पाटील राऊत
भारतातील पाचवा आणि महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उपजिल्हा रुग्णालय भोर येथे भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
ऑक्सफॅम इंडिया संस्था, मिशन संजीवनी च्या मार्फत व श्लमबर्गर इंडिया च्या माध्यमातून सुरु करण्यात आला .. त्याचे उदघाटन आज भोर वेल्हा मुळशी चे आमदार यांच्या प्रयत्नाने आणि हस्ते करण्यात आले…
सदरील प्लॅन्ट या ठिकाणी सुरु केल्याने *६० ते ८० ऑक्सिजन बेडला एकाच वेळी ९५ % प्युअरीटीसह* ऑक्सिजन देता येणार आहे. भोर शहर व भोर तालुक्यातील रुग्णांना या सेवेचा लाभ मिळणार आहे याकरिता रु.१ कोटी ३० लक्ष निधी उपलब्ध केला होता. भारतातील पाचवा व महाराष्ट्रातील हा पहिला प्लांट भोर उपजिल्हा रुग्णालयात सुरु करताना मनापासून समाधान वाटत असल्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले..
प्रसंगी भोरचे प्रांताधिकारी श्री.राजेंद्र कचरे,तहसिलदार श्री.अजित पाटील, गटविकास अधिकारी श्री.विशाल तनपुरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद साबणे,ऑक्सफॅम इंडियाचे संचालक श्री.पंकज आनंद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे प्रभारी श्री.परमेश्वर पाटील यांचेसह संबधित अधिकारी, भोर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग, पत्रकार, आदि मान्यवर उपस्थित होते.