Home पुणे भारतातील पाचवा आणि महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उपजिल्हा रुग्णालय भोर येथे   ...

भारतातील पाचवा आणि महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उपजिल्हा रुग्णालय भोर येथे               

304
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतातील पाचवा आणि महाराष्ट्रातील पहिला ऑक्सिजन प्लांट उपजिल्हा रुग्णालय भोर येथे                                        भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
ऑक्सफॅम इंडिया संस्था, मिशन संजीवनी च्या मार्फत व श्लमबर्गर इंडिया च्या माध्यमातून सुरु करण्यात आला .. त्याचे उदघाटन आज भोर वेल्हा मुळशी चे आमदार यांच्या प्रयत्नाने आणि हस्ते करण्यात आले…
सदरील प्लॅन्ट या ठिकाणी सुरु केल्याने *६० ते ८० ऑक्सिजन बेडला एकाच वेळी ९५ % प्युअरीटीसह* ऑक्सिजन देता येणार आहे. भोर शहर व भोर तालुक्यातील रुग्णांना या सेवेचा लाभ मिळणार आहे याकरिता रु.१ कोटी ३० लक्ष निधी उपलब्ध केला होता. भारतातील पाचवा व महाराष्ट्रातील हा पहिला प्लांट भोर उपजिल्हा रुग्णालयात सुरु करताना मनापासून समाधान वाटत असल्याचे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले..
प्रसंगी भोरचे प्रांताधिकारी श्री.राजेंद्र कचरे,तहसिलदार श्री.अजित पाटील, गटविकास अधिकारी श्री.विशाल तनपुरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद साबणे,ऑक्सफॅम इंडियाचे संचालक श्री.पंकज आनंद, महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे प्रभारी श्री.परमेश्वर पाटील यांचेसह संबधित अधिकारी, भोर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग, पत्रकार, आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात गँस सिलेंडरचा स्फोट
Next articleव-हाणेत रोटरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सर्वत्र हळहळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here