राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ मुख्याध्यापक म्हणतात माझी जनावरे राखा, शेतात राबा; शिक्षकांचे आमरण उपोषण !
कोल्हापूर ,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) मनपाडळे (ता.हातकणंगले) येथील मनपाडळे हायस्कूलचे संस्थाध्यक्ष असणाऱ्या मुख्याध्यापकांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे पगार न काढल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी बेमुदत उपोषणास आजपासून सुरूवात केली. बेमुदत उपोषणास मनपाडळे येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बसले आहेत.मुख्याध्यापक हे संस्थाध्यक्ष असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची जनावरे राखणे, शेतातील कामे लावणे या सारखी अशैक्षणिक कामे लावतात. यामुळे शाळेत विद्यार्थीही नाहीत. त्यांची वैयक्तिक कामे जर केली नाहीत तर अर्वाच्च शिवीगाळ करतात. त्यांनी मुद्दामहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरहजेरी मांडली असल्याची शिक्षकांची तक्रार आहे.मुख्याध्यापकांनी जुलै २०२१ पासून पगार काढलेला नाही. या बाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सर्व शिक्षकांनी ३० जुलै रोजी तक्रार दिली आहे. त्याची दखल घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना (दि. ६ )रोजी सर्वांचा पगार काढण्याचा आदेश दिला होता. तथापी मुख्याध्यापकांनी त्या आदेशाला जुमानले नाही, असे निवेदनात शिक्षकांनी नमूद केले आहे.