राजेंद्र पाटील राऊत
लोकमान्य टिळक जन्मस्थान खुले करण्याची भाजपाची मागणी
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे
रत्नागिरी- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे रत्नागिरी शहरातील जन्मस्थान हे कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे बंद आहे.महाराष्ट्रामध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत.त्यामध्ये देवालये, सिनेमागृहे, मॉल इत्यादी अनेक स्थळे नियमांचे पालन करुन जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत.व जन्मस्थान बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांना जन्मस्थान तसेच तेथील संग्रहालय पाहण्यापासून वंचित राहत असून कोविड-१९ चे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन व मास्क ,सामाजिक अंतराचे पालन करुन जनतेसाठी खुले करण्यात यावे अशी आग्रही मागणी द.रत्नागिरी भाजपाचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
पुरातत्व विभागाला निवेदन देताना शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, नगरसेविका सौ .मानसी करमरकर, नगरसेविका सौ सुप्रिया रसाळ, शहर चिटणीस राजन फाळके, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम जैन, रत्नागिरी शहर सरचिटणीस संदीप उर्फ बाबू सुर्वे हे उपस्थित होते.