• Home
  • नगर -मनमाड हायवेवरील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधील हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पोलिस

नगर -मनमाड हायवेवरील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधील हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पोलिस

राजेंद्र पाटील राऊत

kbn-10-image.jpg

नगर -मनमाड हायवेवरील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधील हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई, 2 पीडित परप्रांतीय बंगाली महिलांची केली सुटका अहमदनगर(“प्रतिनिधी, प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- अहमदनगर जिल्ह्यतील राहुरी तालुक्यातील नगर -,,मनमाड हायवेवर चिंचोली फाटा येथे सुनील रामचंद्र हारदे यांच्या मालकीचे हॉटेल नंदादीप आहे, सदर चे हॉटेल हे नामांकित व सुप्रसिद्ध असे आहे,परंतु या हॉटेलात बऱ्याच वर्षापासून वेश्या व्यवसाय चालत आहे, या बाबत परिसरात मोठया प्रमाणात दबक्या आवाजात चर्चा चालत असे,परंतु;मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायची;? असा मोठा प्रश्न होता,शेवटी ही बातमी फुटली ,व पोलीस प्रशासनाला जाग आली,व त्वरित पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने हॉटेल नंदादीप येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचा समक्ष छापा टाकून दोन पीडित परप्रांतीय बंगाली महिलांची सुटका केली,आणि आरोपी सुनील रामचंद्र हारदे यास ताब्यात घेण्यात आले,आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन ,जिल्हा ,अहमदनगर येथे,स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा,1956 चें कलमानुसार 3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,मनोज पाटील पोलीस अधीक्षक,मा, दीपाली काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके,पी आय गाडे, स,फौ, राजेंद्र आरोळे,पो हे काँ, सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, रवींद्र मेढे, सुनील शिंदे,सचिन ताजने,सचिन लोंढे, व आदींच्या पथकाने ही महत्व पूर्ण कामगिरी पार पाडली आहे, या अचानक छाप्या मुळे इतर हॉटेल व्यावसायिकां चे देखील धाबे दणाणले आहे,या पोलिसांनी घातलेल्या धाडसी छाप्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे, व पोलिस प्रसाशनाला धन्यवाद दिले आहेत

anews Banner

Leave A Comment