Home मराठवाडा ८० हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…! 🛑

८० हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…! 🛑

359
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 ८० हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…! 🛑
✍️ बीड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बीड:⭕ अटकपुर्व जामीन रोखण्यासाठी ८० हजारांची लाच घेतांना, बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यातील PSI ला रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई बीड व औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल 26 जुलै रोजी सायंकाळी केली आहे. राहुल पांडुरंग लोखंडे असे लाचखोर पीएसआयचे नाव आहे. सध्या ते बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत.

पीएसआय लोखंडे यांनी एका तक्रादाराकडून, गुन्ह्यात मंजूर असलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी, तसेच गुन्ह्यातील वाहने जप्त न करण्यासाठी, एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तडजोडी अंती 80 हजारांची लाच घेताना, बीड व औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुल लोखंडेला रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या कारवाईने लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.⭕

Previous articleलोहणेरच्या वसाकावर अवैध धंद्याना ऊत! “भारत -धर्माची अजब गजब यारी…!! सट्टा मटक्याची राजरोस दुनियादारी..!!
Next articleदोन कोटींची लाच मागणाऱ्या DYSP च्या घरावर छापा ; मिळाली इतकी रक्कम 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here