Home मुंबई दोन कोटींची लाच मागणाऱ्या DYSP च्या घरावर छापा ; मिळाली इतकी रक्कम...

दोन कोटींची लाच मागणाऱ्या DYSP च्या घरावर छापा ; मिळाली इतकी रक्कम 🛑

267
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दोन कोटींची लाच मागणाऱ्या DYSP च्या घरावर छापा ; मिळाली इतकी रक्कम 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ परभणीतील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईकाला दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली.

तक्रारदार व्यावसायिकाची एक ध्वनिफीत प्रसारित झाली होती. त्यावरून तक्रारदाराविरोधात कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेनंतर एसीबीने अधिकाऱ्याच्या दादर येथील फ्लॅटमध्येही शोधमोहीम राबवली. तेथून सुमारे २५ लाखांची रोख जप्त करण्यात आली.

परभणीतील सेलू विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल (५५) व पोलिस नाईक गणेश चव्हाण (३७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ३ मे रोजी तक्रारदाराच्या मित्राचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात एकाला स्थानिक पोलिसांनी अटकही केली होती.

त्यावेळी तक्रारदाराने त्याच्या कर्मचाऱ्याच्या दूरध्वनीवरून मृत मित्राच्या पत्नीला दूरध्वनी केला होता. त्यात काही वादग्रस्त संवाद झाले. ते संभाषण या कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले.

त्यानंतरही पाल तक्रारदाराला नियमित दूरध्वनी करून पैशांची मागणी करत होते.

ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी थेट मुंबई एसीबी व महासंचालक कार्यालयात येऊन याबद्दल तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुंबई एसीबीच्या पथकाने सापळा रचून प्रथम पाल यांचा सहकारी पोलिस नाईक चव्हाणला लाचेचा पहिला १० लाखांचा हप्ता स्वीकारताना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर पाल यांनाही शनिवारी पहाटे याप्रकरणी अटक केली. या अटकेनंतर पालच्या मुंबईतील दादर येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आली.

तेथे २४ लाख ८४ हजारांची रक्कम सापडली. त्यामुळे याप्रकरणी असंपदेचा गुन्हाही दाखल करता येऊ शकतो का, याबाबत एसीबी पडताळणी करत आहे. ⭕

Previous article८० हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…! 🛑
Next article🛑 दरमहिना लाखाचा हप्ता, उस्मानाबादेत महसूल विभागाची वरिष्ठ महिला अधिकारी रंगेहाथ अटक 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here