Home माझं गाव माझं गा-हाणं लोहणेरच्या वसाकावर अवैध धंद्याना ऊत! “भारत -धर्माची अजब गजब यारी…!! सट्टा मटक्याची...

लोहणेरच्या वसाकावर अवैध धंद्याना ऊत! “भारत -धर्माची अजब गजब यारी…!! सट्टा मटक्याची राजरोस दुनियादारी..!!

432
0

राजेंद्र पाटील राऊत

लोहणेरच्या वसाकावर अवैध धंद्याना ऊत!
“भारत -धर्माची अजब गजब यारी…!!
सट्टा मटक्याची राजरोस दुनियादारी..!!
मालेगांव,(विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- गिरणा नदीच्या काठावर वसलेले सुललाम सुफलाम म्हणून ओळखले जाणारे लोहणेर गाव व त्या परिसरातील विठेवाडी साखर कारखाना भाग हा सध्या अवैध धंद्याचा हाँटस्पाँट बनलेला असून ,पोलिस प्रशासनाचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने या अवैध धंद्याना ऊत आला असल्याने सट्टाकिंग मजेत व गोरगरीब लुटमारीची शिकार ठरत आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,लोहणेर व वसाका परिसरात भारत निकम व धर्मा शेवाळे नामक सट्टाकिंग नेमके कुणाच्या आशिर्वादाने सट्टा,मटका चालवून गोरगरीबांच्या संसाराची राखरांगोळी करीत आहेत हे न उलगडलेले भयानक कोडेच आहे.या सट्टा मटक्याच्या माध्यमातून रोजच लाखो रुपयांची रग्गड कमाई करणाऱ्या भारत धर्माच्या जोडीगोळीने मात्र आपला अवैध धंदा तेजीत ठेवण्यासाठी गोरगरीब महिलांच्या संसारात माती कालविण्याचेच महापाप चालविल्याने आणि पोलिस प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या परिसरात सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या अवैध धंद्यावर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे.
उद्या वाचा- सट्टा मटक्याची खेळी,गोरगरीबांचा जातो बळी!पोलिस खात्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष…

Previous articleनांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या चाचण्या होणार – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next article८० हजारांची लाच घेतांना PSI ला रंगेहाथ पकडले…! 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here